You are currently viewing सावंतवाडीत होणार्‍या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावा…

सावंतवाडीत होणार्‍या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावा…

प्रविण भोसलेंची राहुल नार्वेकरांकडे मागणी; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी घेतली भेट…

सावंतवाडी

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यामुळे आवश्यक त्या बैठका घेवून यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
दरम्यान हॉटेेल उदयोजकांना कवडीमोल भावाने जमिनी दिल्या गेल्या. परंतू त्यावर अद्याप पर्यत कोणताही प्रकल्प उभारला गेला नाही. त्यामुळे अशा जमिनी पुन्हा ताब्यात घेवून शेतकर्‍यांना परत कराव्यात, अशी ही मागणी त्यांनी केली.
श्री. नार्वेकर यांची आज राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. भोसले यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली. आपण सावंतवाडीचे सुपुत्र असल्यामुळे अधिकचा लक्ष या ठिकाणी द्यावा आणि रेगाळलेले प्रश्न सोडवावेत, अशी मागणी भोसले यांनी केली. यावेळी आपण ही या प्रश्नाबाबत सकारात्मक आहोत आणि लवकरच याबाबत योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन श्री. नार्वेकर यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =