You are currently viewing राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले ४७ कॉन्सन्ट्रेटर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले ४७ कॉन्सन्ट्रेटर

जिल्हा रुग्णालयात झाला शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जिल्हा सिंधुदुर्ग, प्राणवायू योजने अंतर्गत सेवा इंटरनॅशनल याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर सह जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयांना ४७ अत्याधुनिक अशी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आली. याचा शुभारंभ जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग याठिकाणी करण्यात आला.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना वैश्विक महामारी ने कहर केला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. ही ऑक्सिजन ची कमतरता थोड्या प्रमाणात पूर्ण करता यावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती प्राणवायू योजनेअंतर्गत सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय तसेच काही खाजगी रुग्णालयांना ४७ अत्याधुनिक अशा ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय या रुग्णालयात या पैकी दहा ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर देऊन, या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांना सुपुर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत सह संघचालक यशवंत तथा बाबा चांदेकर, जिल्हा रुग्णालयाचे डॉ श्याम पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ योगेश नवांगुळ, कार्यवाह जयेश खाडिलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ. प्रविणकुमार ठाकरे, मालवण तालुका संघचालक तथा जिल्हा संपर्क विभाग प्रमुख वकील समीर गवाणकर, जिल्हा प्रचार विभाग प्रमुख लवू म्हाडेश्वर, प्राणवायू योजना जिल्हा संयोजक अविनाश पाटील, जनकल्याण समितीचे हेमंत आईर, जितेंद्र चिकोडी, प्रभाकर सावंत, डॉ प्रशांत मंडव, अविनाश पराडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक रमेश ढेबे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय तसेच खाजगी रुग्णालय आणि कोविड सेंटर अशा ठिकाणी ४७ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. यात अत्यावश्यक सेवेसाठी रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित रुग्णोपयोगी साहित्य केंद्र – १०, जिल्हा रुग्णालय, ओरोस – १०, ग्रामीण रुग्णालय, दोडामार्ग – ३, उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा – २, होमगार्ड कोविड केंद्र, ओरोस – २, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय – २, डॉ दिघे, मालवण – २, ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी – २ डॉ प्रशांत मडव, जांभवडे – २ कणकवली नगरपरिषद कोविड केंद्र – २, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी – २, आपटे मेडीकल, फोंडाघाट- १, डॉ प्रसाद मालंडकर, खारेपाटण – १, डॉ जी टी राणे -२, डॉ विवेक रेडकर रिसर्च हॉस्पिटल, मालवण – २ आणि श्री साई डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कारीवडे, सावंतवाडी – २ अशाप्रकारे देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा