You are currently viewing पी. एफ. डॉण्टस यांना सैनिक स्कूल आंबोली मध्ये श्रद्धांजली अर्पण

पी. एफ. डॉण्टस यांना सैनिक स्कूल आंबोली मध्ये श्रद्धांजली अर्पण

पी. एफ. डॉण्टस यांना सैनिक स्कूल आंबोली मध्ये श्रद्धांजली अर्पण

आंबोली

सैनिक स्कूल, आंबोली येथे मा. ब्रिगेडिअर सुधीर सावंत, श्री. सुनिल राऊळ इतर मान्यवर तसेच सर्व शिक्षक-विदयार्थीच्या उपस्थितीत आज दि. १४ ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सैनिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मा. पी. एफ डॉण्टस यांचे शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सहकार, शिक्षण, राजकारण आणि माजी सैनिक संघटना अशा विविध क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कार्य करणारे साहेब स्वर्गवाशी झाले. सैनिक स्कूलच्या स्थापनेपासून ते आज मितीस सैनिक स्कूलच्या यशाच्या सर्वच सुख-दुखाचे भाग असणारे साहेब हे सैनिक स्कूल चे आधारस्तंभ होते. हा वटवृक्ष सैनिक स्कूलच्या मना-मनात सदैव प्रेरणादायी राहणार आहे. साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी मा. ब्रिगिडेअर सुधीर सावंत, सेक्रेटरी सुनील राऊळ, सैनिक पनसेक्येचे चेअरमन कविटकर साहेब, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, प्राचार्य एनडी गावडे आणि इतर मान्यवर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते

प्रथम साहेबांच्या स्मृतीला पुष्पांजली अर्पण केली आणि मान्यवरांनी साहेबांच्या विचारांना कार्याचा आठवणींना उजाळा दिला. यामध्ये प्राध्यापक हंबीरराव अडकुळकर साहेब यांनी साहेब आणि सैनिक स्कूल हे अमृततुल्य मिश्रण अशा भावना व्यक्त करीत साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. मा. सुनील राऊळ यांनी माझा खरा गुरु हरवल्याचे दुःख व्यक्त करून त्यांच्या कामा चा महान रथ आपण सक्षमपणे पुढे नेऊ असा निश्चय व्यक्त केला. तर ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी हे माझे सच्चे सहकारी होते ते सहकार शिक्षण आणि राजकारणाचे तज्ञ होते. त्यांनी आणि आपण अनेक संस्था उभ्या केल्या आणि नावारूपाला आणल्या. असा सच्चा मित्र हरवल्याचे त्यांनी दुःख व्यक्त केले.

यावेळी प्राचार्य एन.डी. गावडे यांनी देखील साहेबांचा वसा आपण पुढे चालू ठेवू आणि आदर्श विद्यार्थी निर्माण करू असे प्रतिपादन केले.

या विचारांचा जागरण आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोतदार सर यांनी केले. या कार्यक्रमास ब्रिगेडियर सुधीर सावंत, सेक्रेटरी सुनील राऊळ, चेअरमन पतसंस्था कवीटकर साहेब, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य एन.डी. गावडे आणि इतर मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*

होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗

*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*

☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️

डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..

– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali

*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा