You are currently viewing अखेर जामीन झालाच! सत्तेचा दबाव झुगारत न्यायदेवतेनेही दिला नारायणराव राणेंना न्यायाचा आशिर्वाद!!

अखेर जामीन झालाच! सत्तेचा दबाव झुगारत न्यायदेवतेनेही दिला नारायणराव राणेंना न्यायाचा आशिर्वाद!!

भाजपा सोशल मीडियाचे अविनाश पराडकर आणि राजवीर पाटील यांनी व्यक्त केली निकालावर प्रतिक्रिया! मानले न्यायालयाचे आभार!!

“सत्य परेशान हो सकता है, पराजित नही” याचा प्रत्यय  पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला आला. राजकीय सूडाच्या शिवसेनेच्या राजकारणाला गाडत नारायणराव राणें यांच्या संघर्षाला आज न्यायालयीन प्रक्रियेनंतर जामीन मिळाला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या लढ्यातील विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आहे.

सत्ता म्हणजे कायमचा अमरपट्टा नव्हे याचे भान न ठेवता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंभोवतीच्या कारस्थानी बारभाई मंत्र्यांनी राणेंना अडकवण्यासाठी जंग जंग पछाडले. सत्तेआडून पोलीस यंत्रणा वापरणाऱ्या या शिवसेना नेत्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना बॅकफूटवर गेली. आता न्यायालयानेही राणेंना जामीन दिल्याने शिवसेना चांगलीच तोंडावर आपटली आहे. संवेदनशील परिस्थितीत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल अविनाश पराडकर आणि राजवीर पाटील यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा