You are currently viewing वेंगुर्ले किनळणेवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीच्या वासराचा मृत्यू

वेंगुर्ले किनळणेवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीच्या वासराचा मृत्यू

भर वस्तीत बिबट्या वाघाच्या संचाराने भितीने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील किनळणेवाडी येथील शेतकरी सुहास सहदेव तो यांच्या गोठयातील गायीच्या 4 वर्षांच्या वासरावर मंगळवारी मध्यरात्रीच्या 1 च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने गायीचे वासरू मृत्यमुखी पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सुहास तोरसकर यांनी बुधवारी सकाळी वनविभागाला माहिती दिल्याने मठ वनपाल अण्णा चव्हाण, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी पंचनामा केला आहे.
संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले असून त्वरित नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी दक्षता घेण्याचे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =