You are currently viewing दुर्लक्षित असणाऱ्या खंडागळे वाडीसाठी कायमस्वरूपी रस्ता मंजूर करून तो परशुराम वाडी मुख्य रस्त्याला जोडावा….

दुर्लक्षित असणाऱ्या खंडागळे वाडीसाठी कायमस्वरूपी रस्ता मंजूर करून तो परशुराम वाडी मुख्य रस्त्याला जोडावा….

सौ.दिक्षा खंडागळे यांचे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन

देवरुख प्रतिनिधी
मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या खंडागळे वाडीसाठी गोताडवाडी- एरंडेवाडी रस्त्या येथून वाडीसाठी कायमस्वरूपी रस्ता मंजूर करावा अशी विनंती गाव विकास समितीच्या सौ.दिक्षा खंडागळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ यांना दिलेल्या पत्रात सौ. दिक्षा खंडागळे यांनी म्हटले आहे की,मागील 70 वर्षांपासून रस्त्यापासून वंचित असणाऱ्या खंडागळे वाडीला एरंडेवाडी रोड ते खंडागळे वाडी असा सुमारे 500 मीटर चा रस्ता तसेच पुढे पावाचा दंड असा परशुराम वाडीच्या दिशेने जाणारा कायमस्वरूपी रस्ता मिळावा, यासाठी आपल्या स्तरावररून संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात अशी मागणी सौ.दिक्षा खंडागळे यांनी केली आहे.खंडागळे वाडी बाहेरून दोन वर्षांपूर्वी गोताडवडी- एरंडेवाडी रस्ता गेला आहे.या रस्त्यापासून 500 मीटर आत मध्ये खंडागळे वाडी असून हा 500 मीटरच्या अंतरामध्ये कच्चा रस्ता देखील नसून या रस्त्यासाठी आपण संबंधित अधिकारी व विभागांना सूचना द्याव्यात मागील अनेक वर्षात स्थानिक ग्रामपंचायत मार्फत हा रस्ता होणे अपेक्षित होते मात्र तो अद्याप झाला नसून आपण या प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती सौ.दिक्षा खंडागळे यांनी केलीआहे.

त्याच बरोबर हा रस्ता खाली पावाचा दंड येथे प्रस्तावित परशुराम वाडी ब्रीज ला जोडल्यास या वाडीतील नागरिकांना देवरुख शहराशी दळणवळण च्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे सौ दिक्षा खंडागळे यांनी जिल्हाधिकारी व सीईओ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 8 =