*काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली नूतन पोलीस अधीक्षक डाॅ. मोहन दहिकर यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. जिल्ह्यातील अनैतिक धंद्याना आळावा घालावा. अंमली पदार्थांमुळे तरुणपिढी उद्ध्वस्त होत असून याचा बंदोबस्त करवा. घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून या संदर्भात उपाय योजना करावी. अश्या अनेक कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलीस अधीक्षक डाॅ. मोहन दहिकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पुष्प गुच्छ देऊन पोलीस अधीक्षकांचे जिल्ह्यात स्वागत करून जिल्ह्यातील कामगीरी बाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रांतिक सदस्य प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू,सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, विनायक मेस्त्री, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, प्रवीण मोरे, वेंगुर्ला युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब, ओरोस शहर अध्यक्ष महेश परब, व्ही.के. सावंत,बाबू गवस, सावंतवाडी सेवादल अध्यक्ष संजय लाड, सुभाष नाईक इत्यादी उपस्थित होते.