आयनल ग्रामपंचायतमध्ये पोस्ट ऑफिस ८ दिवसांत स्थलांतरित करा…

आयनल ग्रामपंचायतमध्ये पोस्ट ऑफिस ८ दिवसांत स्थलांतरित करा…

ग्रामस्थांची मागणी; अन्यथा उपोषण, डाक अधिका-यांना दिला इशारा..

कणकवली

आयनल ग्रामपंचायत येथे पोस्ट ऑफिस स्थलांतर करण्यासंदर्भात सन २०१६ भारतीय डाक विभाग सिंधुदुर्ग यानी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार आयनल ग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव करत अधिक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग याना ठरावाची प्रत देत जागा उपलब्ध करुन देत असल्याचे कळवले होते .त्यानंतर सातत्याने गेली ४ वर्षे पाठपुरावा करुन देखिल पोस्ट ऑफिस स्थलांतर करण्यास टाळाटाळ केली जात आहे .त्यामुळे येत्या ८ दिवसांत डाकघर विभाग , सिंधुदुर्ग व कणकवली उपविभाग अधिकाऱ्यांनी पोस्ट ऑफिस कार्यालय स्थलांतर न केल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषण करू,असा इशारा आयनल ग्रामस्थांची भारतीय डाक उपविभाग निरीक्षक कणकवली एस. व्ही. कामते यांना दिला आहे.
यावेळी आयनल सरपंच बापू फाटक, साईनाथ ओटवकर, भगवान मसुरकर,आदेश ओटवकर, सत्यविजय चव्हाण, प्रशांत चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी टाक निरीक्षकांची झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी गेल्या चार वर्षातील केलेला पाठपुरावा आणि आपल्या कार्यालयात कडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे गावात वाद होत असल्याची विचारणा केली.यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढून पोस्ट कार्यालय स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा