You are currently viewing सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

सावंतवाडी :

 

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्यावतीने रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे देण्यात आले.

सावंतवाडी येथील नेत्ररोग तज्ञ डॉ विशाल पाटील यांनी दयासागर छात्रालयातील सर्व विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. त्यानंतर नंबरचा चष्मा आवश्यक असलेल्या अभिताय शेटकर, साईश जाधव, तन्मय मोरजकर, आदर्श सावंत, भावेश सावंत, काशिनाथ मुळीक, भूषण करंजेकर या सात विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यात आले.

यावेळी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीण कुमार ठाकरे, नेत्र रोग तज्ञ डॉ. विशाल पाटील, दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक जीवबा वीर, पत्रकार मंगल कामत आदी उपस्थित होते. यावेळी जिवबा वीर यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा