You are currently viewing विद्यार्थीप्रिय शिक्षक शशिकांत निखार्गे यांचे दुःखद निधन

विद्यार्थीप्रिय शिक्षक शशिकांत निखार्गे यांचे दुःखद निधन

सावंतवाडी :

मिलाग्रिस हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत निखार्गे यांचे दुःखद निधन झाले. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव – भोमवाडा येथील ते रहिवाशी होते. मिलाग्रीस हायस्कूलमध्ये ३० वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावली. इतिहास हा विषय ते दहावीपर्यंत शिकवत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर निखार्गे सरांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा