You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड ( UDID ) शिबीराचे आयोजन

वेंगुर्ले तालुक्यात दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड ( UDID ) शिबीराचे आयोजन

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती संस्थेचा पुढाकार

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या वतीने वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वेंगुर्ले तालुक्यातील दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड ( UDID ) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
वेंगुर्ले तालुक्यातील दिंव्यांगांना दिंव्यांग प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड मिळविण्यासाठी ओरस येथील जिल्हा रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागतात . तसेच दिव्यांगांना तिकडे जाण्यासाठी सोबतीला कुणालातरी घेऊन जावे लागत असल्याने ही बाब खर्चीक असल्याने बरेच दिंव्यांग हे स्वावलंबन कार्ड पासुन वंचित आहेत . त्यामुळे दिंव्यांग असुनही त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळत नाही . याकरिता वेंगुर्ले तालुक्यामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . तरी वेंगुर्ले तालुक्यातील जास्तित जास्त दिव्यांगांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात येत आहे .
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे व भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.नागरगोजे यांची भेट घेऊन वेंगुर्ले येथे शिबीर घेण्याची मागणी केली . यावेळी शिबीरासाठी लागणारे डाॅक्टर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले , तसेच शिबिरास सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले . यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.श्रीपाद पाटील , वाचा उपचार तज्ञ डाॅ.श्रीधर पोवार , डाॅ.भगत उपस्थित होते .
जिल्हा शल्यचिकित्सक यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात शामसुंदर लोट , दिक्षा तेली , प्रकाश वाघ , स्वाती राऊळ , प्रशांत केळुसकर , निलम राणे उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =