You are currently viewing ७ नोव्हेंबर रोजी नारूर येथील श्री देवी महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव

७ नोव्हेंबर रोजी नारूर येथील श्री देवी महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव

कुडाळ :

 

नारूर येथील श्री देवी महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निमित्त ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दि. ७ रोजी सकाळी ६.३० वा. त्रिपुरारी पौर्णिमा व वार्षिक जत्रोत्सव निमित्त सामुदायिक प्रार्थना, सकाळी ७ वा. लघुरूद्राभिषेक, ९ वा. सालंकृत महापूजा नंतर श्री देवीची ओटी भरणे. नवस बोलणे, नवस फेडणे कार्यक्रमतीर्थस्थान, उत्सवमूर्ती तरांगासहित सायं. ६.३० वा. श्री देवीची तरंगासहित उपदैवतांना भेट, ११ वा. लळीत कीर्तन व अक्षतारूपी महाप्रसाद, सुरुवात दुपारी १ वा. महानैवैद्य व महाआरती, सायं. ७ वा. त्रिपुरवाती पेटवणे कार्यक्रम, ७.३० वा. पुराण वाचण, महाआरती, रात्रौ ११ वा. पालखी सोहळा, १२ वा. वालावलकर दशावतारी नाट्यप्रयोग.

८ रोजी सकाळी ८ ते ११ वा. पर्यंत भाविकांचे अभिषेक सेवा, ११ वा. श्री देवी महालक्ष्मीची सालंकृत महापूजा, दुपारी १ वा. नैवेद्य व आरती, ३.३० वा. कीर्तन व गोपाळकाला, सायं. ५ वा. उत्सव मूर्ती तरांगासहित तीर्थस्थान, सायं. ६.३० वा. श्री देवीची तरांगासहीत उपदैवतांना भेट, रात्री ११ वा. लळीत कीर्तन व अक्षतारुपी महाप्रसाद

९ रोजी सकाळी ८ वा. पासून अभिषेक, सालंकृत महापूजा, दुपारी १२.३० वा . महानैवेद्य, महाआरती, महाप्रसाद, सायं. ४ वा. सांगता व आशीर्वादरुपी गाऱ्हाणे असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी महालक्ष्मी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नारुर, महालक्ष्मी देवस्थानचे चार बारा गावकर मंडळी, बहुमानकरी व नारूर ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 15 =