You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सर्जेकोट पिरवाडी (सुवर्णकडा) येथे समुद्र धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सर्जेकोट पिरवाडी (सुवर्णकडा) येथे समुद्र धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन

बजेट अंतर्गत १ कोटी २८ लाख रु निधी मंजूर

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील सर्जेकोट पिरवाडी (सुवर्णकडा) येथे समुद्र धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर केला असून त्यासाठी बजेट अंतर्गत १ कोटी २८ लाख रु निधी मंजूर केला आहे. गुरुवारी सायंकाळी या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थ व मच्छिमारांनी समाधान व्यक्त करत आ. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.


सर्जेकोट समुद्र किनाऱ्याची धूप होत असल्याने त्याठिकाणी समुद्र धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांकडून होत होती. आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करून बजेट अंतर्गत या बंधाऱ्यासाठी निधी मंजूर करून घेतला असून या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम सुरु करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,शहरप्रमुख बाबी जोगी, उप शहरप्रमुख सन्मेष परब, उपविभागप्रमुख अमोल वस्त, महिला तालुका संघटक दीपा शिंदे,ग्रा. प. सदस्या भारती आडकर, शाखा प्रमुख विनायक कोळंबकर, मामा खडपकर,अन्वय प्रभू, पतन सहाय्यक अभियंता प्रशांत पवार, कनिष्ठ अभियंता महेश बाबल, सहाय्यक अभियंता समाधान जाधव, विनायक आरोलकर, केतकी सावजी, तृप्ती आडकर, संजय जामसंडेकर, नरेंद्र जामसंडेकर, मामा खडपकर, सचिन जामसंडेकर,अक्षय जामसंडेकर,संतोष जामसंडेकर,वैभव कांदळगावकर,योगेश कांदळगावकर, निवृत्ती कांदळगावकर, आनंद खवणेकर, दीपक जामसंडेकर, प्रवीण खवणेकर, हरी खवणेकर, संजय आडकर, अवधूत आडकर, नारायण आडकर, प्रशांत जामसंडेकर, प्रसाद कांदळगावकर, जयवंत कांदळगावकर,मयूर खावणेकर,अरुण जामसंडेकर,गोपाळ आडकर, नाना आडकर, स्नेहा शेलटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 16 =