You are currently viewing भजनातून मन शुध्दी चित्त शुध्दी आणि भक्तीमार्ग’
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

भजनातून मन शुध्दी चित्त शुध्दी आणि भक्तीमार्ग’

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखीत अप्रतिम लेख*

*’भजनातून मन शुध्दी चित्त शुध्दी आणि भक्तीमार्ग’*

मनशुध्दी आणि चित्त शुध्दी यातून निर्माण होणारी श्रध्दा म्हणज भजन’,’भजन’जेव्हा मनापर्यंत पोहचते तेव्हा अंतकर्णातून भावभक्ती आणि प्रार्थना जन्माला येते.विचार आणि मनाला एकाग्रतेत ठेवण्याच काम भजन करत असते.चित्त व चितंन वाढवण्यासाठी भजन खूप महत्त्वाचे आहे.मनाला व आत्म्याला शुध्द करण्यासाठी भजन हे खूपच प्रभावी माध्यम आहे.भाव,भक्ती,भजन,चित्त आणि चिंतन जेव्हा मेंदू पर्यंत पोहचते तेव्हा खऱ्याअर्थाने बुध्दी क्रियाशील होते बुध्दीला चालना मिळते,बुध्दी जेव्हा कार्यश्रम होते तेव्हा माणसाला भजनाचा नाद लागतो.या नादातूनचं भावभक्ती, श्रद्धा,मनाला,चित्त आणि चिंतनात विलीन करते आणि मन जेव्हा स्थिर,शांत,एकाग्र होते तेव्हाच हात आपोआप जोडले जावून देवघरात किंवा देवळात आपण नतमस्तक होतो.म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भजनाची आवड असायलाच हवी.भजन असेल तरचं भक्तीचे श्रद्धेत रूपातंर होते. आजही काही ग्रामीण भागात नित्यनियमाने देवळात भजन म्हटली जातात.संध्याकाळ झाली की सर्व ग्रामस्थ एकत्र येवून भजनात दंग होतात.भजनात तल्लीन झाल्यानंतर जणूकाही माणसांच्या अंगात एक नविन उर्जा संचारते, नवचैतन्य निर्माण होते, खरतर नादखुळ्या माणसालाच भजनाचा नाद असतो आणि अशि नादखुळी माणस बहुदा ग्रामीण भागात जास्त बघायला मिळतात. आपली दैनदिन दिनचर्या सांभाळून दिवसभराच्या कामात थकवा आल्यावरही आंघोळपाघोळ करून दमलेले पाय देवळाच्या दिशेनी वळतात आणि भजनात दंग होवून स्वतःच्या जीवनात रंग भरतात.हे सर्व करायला किंबहुना घडवून आणायल माणसाला नाद किंवा आवड असणे अपेक्षित आहे त्याशिवाय भजनाचे भोजन गोडं लागत नाही.
भजन म्हणजे आत्मशुध्दी!भजनामुळेच माणसाच्या मनावरची मरगळ दुर होते भजनात दंग होताना माणूस त्यावेळेस वेगळ्याच भाव विश्वात रमलेला असतो.
अर्थातच एकप्रकारे भजनातून देवाला केलेली आराधना असते. त्या आराधनेतून जणूकाही देवभेटल्याचा आनंद झाल्याशिवाय रहात नाही.म्हणून ग्रामीण भागात आजही भजन म्हणण्याची प्रथा कायम आहे.परमेश्वराशी एकरूप होण्याचा जवळचा मार्ग म्हणजेच भजन.भजन अथवा देवघर तसेच देवळात मनोभावे केलाली प्रार्थना माणसाला नकारात्मकतेतून सकारात्मकतेत परिवर्तन करत असते.व्यथा,वेदना, दूःख,अडचणी, यातून काहीवेळ बाहेर पडून भगवंताचे अनेक रूप बघण्याचा आनंद भजनातून मिळत असतो
भजनातून मिळणारे समाधानच माणसाला भक्तीमय मार्ग दाखवत असते.त्या वातावरणाचा सुगंध मनाला तृप्तीचा आनंद देत असते.अस म्हणताना की
*भजनाच्या भोजनातून*
*मिळे सखोल ज्ञान*
*देवाच्या नादात रंगते देहभान*
*एक नाही देवा तुझे अनेक रूप रंग*
*देवा तुझ्या भजनात होते सारे दंग*
तर असा भजनाचा गोडवा की ज्यामुळे माणसात बदल होतो एखाद्या चांगल्या गोष्टीचा लळा लागला की त्यातले महत्त्व,त्यातला अर्थ माणसाच्या मनावर आघात करतो.जेव्हा एखाद्याचा मार्ग किंवा सवयी चुकीच्या असतील तर भक्ती मार्गातून त्याचे चांगल्यात रूपांतर होते. वाईट वळणावरचा माणूस चांगल्या वाटेने मार्गस्थ होतो.एव्हढी शक्ती भजनात आहे माणसाच्या माणसिकतेस काहीतरी चांगले करण्याची ईच्छा निर्माण झाली की मगं त्याच्यात माणूसपण येते आणि विचार आपसूकच सत्मर्गाला लागतात. सवय चांगली लगते चांगल्या सवयीमुळेच माणसात बदल होतो आपण काय बोलतो काय बघतो,काय करतो जे करतो ते सर्व चांगल होण्यासाठी सतमार्गी सतकर्म महत्त्वाचे आहेत आणि सतकर्माची वाट माणसाला भजनाच्या दिशेने वळवते भजनातून परमेश्वराला बघण्याची द्रुष्टी प्राप्त होते. भजनातून आत्मबळ मिळते,आध्यात्मिक प्रगती होते.
भजन हे देवळातचं म्हटले पाहिजे असं नाही,चालता बोलता केंव्हाही कुठेही म्हटले तरी हरकत नाही काम करता करता भजनातून देवाचे नामस्मरण केले तरी एक आत्मीक समनाधान झाल्याशिवाय रहात नाही.भजन म्हणजे काय? तर आनंद, एखादे चांगले काम करताना किंवा झाल्यावर जो आनंद होतो.तो आनंद भजनातून व्यक्त होतो असाही भजनाचा अर्थ काढता येवू शकतो.फार पुर्वी म्हटलेतर जुन्या काळात बायका जेव्हा शेणामातीने घर सारवताना लिंपाताना,स्वयंपाक करताना,भांडी घासताना,जात्यावर दळण दळताना किंवा घरातील ईतर कामे करायची तेव्हा काम करता करता गाणे म्हणायचे नाहीतर गाणे गुणगुणायचे.म्हणजे कुठलेही काम हाती घेतले की नकळतपणे मुखातून भावगीत, भक्तीगीत,किंवा भजनाचे बोल मुखातुन निघायचे यामुळे कामही लवकर व्हायचे आणि गाण म्हणण्याचा छंदही पुर्ण व्हायचा.शेतात सुध्दा बायका,माणसं वखरणी,नांगणी,पेरणी, लावणी,कापणी,करतान
भावगीत,भक्तीगीतांच गुणगान गाताना त्या शेतातल्या मातीत भावभक्तीचा भजनाचा प्रभाव त्या पिंकावर पडायचा आणि मग शेत जेव्हा हिरवेगार व्हायचे तेव्हा शेतकऱ्याचा चेहऱ्यावरचा आनंद जगावेगळाच असायचा त्या आनंदाला काही मर्यादाच नसायची म्हणजे म्हणायच झालं तर
*गुणगुण गाण्यातून*
*मन रमते*
*भजनाच्या नादातून*
*शेत फुलते*
*खळखळ पाणी वाहत पाणी*
*भावभक्तीत लाडावते*
*हलवार हळुवार*
*हिरव्या हिरव्या पिंकाना मिठी मारते*
*लावणी पेरणी कापणी करताना*
*शेतकरी भारावून जातो*
*भजनात दंग होवून*
*भजनात रंगतो*
असा हा भावभक्तीता भोळा शेतकरी भक्तीमय वातावरणात हरवून जातो आणि त्याची देवावरची श्रद्धाही फार मोठी असते.बघाना विशेष म्हणजे शेतातून मिळणाऱ्या पहिल्या भाराचं धान्य त्याला ‘रास’असही म्हणतात. तर ती धान्यांची ‘रास’ देवापुढे ठेवून त्याची पुजा करून ती रास देवाला अर्पण करतात.आज अशी प्रथा कदाचीत असेल पण त्याकाळी देवाच्या कृपेने शेतात पिकलेल्या धान्याचा अर्धा भाग देवाच्या नावे काढत असे.म्हणजे
*देवाचेच देणे*
*देवालाच दान*
*देवाच्या चरणात*
*ठेवला चतकोर वान*
*माझ्याधी देवा एका घासावर*
*तुझा पहिला मान*
त्या काळी भोळ्या मनाची भोळी माणसं देव पुजल्याशिवाय काहीच करत नव्हते
*देव आपल्याच* *अवतीभवती असतो*
*भजला पाहिजे*
*संसाराच ओझ घडीभर सोडलं पाहिजे*
खरं आहे घरदार बायका पोरं संसार काही सुटत नाही.या विवंचनेत भजन,किर्तन,नामस्मरण,होत नाही.हल्लीच्या काळात या मोबाईल युगात भजन किर्तन फार कमी प्रमाणात होत असतात.नाहीतरी सध्याच्या काळात प्रत्येकाला मोबाईल फार महत्वाचा झाला आहे.माणसांच लक्ष फक्त मोबाईल मध्येच केंद्रीत झाल्यामुळे भावभक्ती भजन,प्रार्थना अशा गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाही.ज्याच्याशिवाय माणसाचे जगणे नाही अशा परमेश्वराच्या नामस्मरणाला कसे विसरून चालेल बरं.’जनाबाई’ सतत देवाच्य नामस्मरणात असायच्या म्हणून प्रत्यक्ष देव त्याच्या मदतीला धावून यायचा.संत एकनाथ,नामदेव,तुकाराम,ज्ञानेश्वर महाराज आणखी कितीतरी संताची नावे घेता येतीलं की ज्यांनी आपल्या भजनातून भारूडातून समाजप्रबोधन केले भावभक्ती प्रार्थनेच्या माध्यमातून मन परिवर्तन केलेत भजतातून सामाजीक प्रबोधन करताना सुसंस्कृत संस्कृतीला जन्म दिला. आणि आदर्शवादी पिढी घडवून प्रभुचरणी लिन झालेत.आज काही समाज कंटक स्वयंम घोषीत संतानी सुसंस्कृत होवू पाहणाऱ्या पिठीला चुकीचा संदेश किंवा मार्गदर्शन करून वाईट वळणाला लावण्याचं आपण वाचतो किंवा बघतो.तेव्हा मनशुध्दी चित्तशुध्दीसाठी आजच्या काळात भजन असने खूप गरजेचे आहे. मोबाईल जर बाजूला ठेवून परमेश्वर काय आहे किंवा भजन काय आहे. हे जर समजले किंवा समजून घेतले तर मोबाईल मधे रंगलेली आजची पिढी निश्चित भजनात दंग होईल.

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

 

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − one =