You are currently viewing सहशालेय उपक्रमातून पर्यावरण व्यवस्थापन

सहशालेय उपक्रमातून पर्यावरण व्यवस्थापन

*श्री प्रकाश विठोबा कानूरकर अध्यक्ष, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र जिल्हा सिंधुदुर्ग लिखित अप्रतिम लेख*

*सहशालेय उपक्रमातून पर्यावरण व्यवस्थापन*

*पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी समर्पित अशी पिढी तयार व्हावी इतकी व्यापकता. शिक्षणात आणि व्यवस्थापनात आणावी लागेल. पर्यावरण हा आपला पूर्वजांचा घरचा आणि भावी पिढ्यांचा अनमोल असा ठेवा असून आपण हा खनिजा सांभाळणारे केवळ विश्वस्त आहोत. इतपत भावनिक विचार साध्य करण्याइतके पर्यावरण व्यवस्थापन सक्षम असले पाहिजे. निसर्गामध्ये कमीत कमी ढवळाढवळ करून निसर्गावर जीवापाड प्रेम करणारी, निसर्गाचा आदर करणारी पिढी घडविण्याइतपत मोठा आवाका पर्यावरण व्यवस्थापनाचा असला पाहिजे. निसर्गसंगत कार्य करणे पुण्य तर निसर्गाच्या विरोधात जाणे पाप आहे. ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या,नागरिकाच्या मनात शालेय शिक्षणात निर्माण करता आली पाहिजे*

आज आपण ५जुन हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहे त्या अनुषंगाने मी आपल्या समोर व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अगदी बालकांपासून ते वृद्धापर्यंत ऑक्सिजन किती आवश्यक आहे.आणि तो मिळवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे हे सर्वांना कळून चुकले आहे..
मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यात एक अतूट असे नाते आहे. मानव, निसर्ग व निसर्गातील सर्व घटक यांच्या परस्परसंबंधाचा विचार म्हणजे ‘पर्यावरण’ अर्थात निसर्गातील जीवनचक्राचा विचार म्हणजेच पर्यावरणाचा विचार होय.
पर्यावरणाचा परिणाम हा निसर्गातील सर्व बाह्य घटकांच्या, सजीवांच्या निर्मिती व वाढीवर होतो. म्हणून पर्यावरणामध्ये मानव हा महत्त्वाचा घटक ठरतो. तो स्वतःच गतिमान असल्यामुळे पर्यावरणातील बदलास तोच कारणीभूत असतो. त्यानेच सभोवतालच्या सजीव व निर्जिव घटकांवर परिणाम केलेला आहे. त्यातूनच विविध प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर नियंत्रण व पर्यावरण संरक्षण करण्यासाठी विविध कायदे करण्यात आले. जसे Explosive Substance Act-1908, Indian Forests Act-1927. Factories Act-1948 Industries Act-1951, इ. त्याचप्रमाणे जून १९७२ मध्ये युनोने स्टॉकहोममध्ये ‘मानव पर्यावरण परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेसाठी भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गेल्या होत्या.हे सर्व कायदे केंद्रीय स्तरावर करण्यात आले तर काही कायदे राज्य स्तरावरही करण्यात आले.
Acquisition of land for flood control and prevention and Erosion Act 1955, Gujarat Smoke Nuisance Act1963, Bengal Smoke Nuisance Act 1963 Prevention and control of Water and Air Pollution Act 1974, Prevention and Control of pollution Act 1981, 8६८ मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा असे अनेक कायदे करूनही पर्यावरण संरक्षण होऊ शकले नाही.

“विद्याथ्र्यांना लहानपणापासूनच पर्यावरण संरक्षणाबाबतची माहिती सांगून त्यांना त्याबाबत जागरुक करून मत परिवर्तन होईल अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी विविध बाबी, कार्य, उपक्रम यांचे नियोजनपूर्वक आयोजन करणे म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन होय.’

गेल्या दोन तीन दशकांपासून पर्यावरण शिक्षण शाळा. महाविद्यालयांतून दिले जात आहे. व्यक्ती विकासावर परिणाम घडवून अनेक घटकांचा व त्यांच्या परिणामाचा मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे म्हणजे पर्यावरण शिक्षण’ होय.

पर्यावरण शिक्षणापेक्षा पर्यावरण व्यवस्थापन ही व्यापक कल्पना आहे. पर्यावरण व्यवस्थापन प्रक्रियेत सर्वांनी व्यवस्थित हातभार लावला तर, पर्यावरण असमतोल कमी होईल सहशालेय उपक्रमातून हे व्यवस्थापन कसे साधता येईल ते पाहू.

 

सहशालेय उपक्रम व पर्यावरण व्यवस्थापन
‘जे उपक्रम अभ्यासक्रमाशी संबंधित राहून आकर्षिकता, मनोरंजकता निर्माण करून विकासात्मक उद्दिष्टपूर्ती साधण्याचा प्रयत्न केला जातो त्याला सहशालेय उपक्रम असे म्हणतात ‘

खाली उपक्रम दिले आहेत त्यांची रचना कशी असावी, ते कसे यशस्वी केले जावेत की त्यातून पर्यावरणा बद्दलची जागृती निर्माण होईल याचा विचार केला आहे.

(1) वर्गस्वच्छता व वर्ग सजावट शालेय परिसर – स्वच्छ, रम्य व वृक्षाच्छादित राहावा म्हणून उपक्रमशील विद्यार्थी दैनंदिन गटानुसार वर्गाची खोली, व्हरांडा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर करतील. शालेय खोल्यांच्या भिंतीवर शिक्षक पर्यावरणाची अभ्यासयुक्त माहिती व निसर्ग संदर्भित गीते रिकाम्या तासामध्ये किंवा मधल्या सुटीत लिहीतील.

शिवाय वर्ग सुशोभित व प्रसन्न करण्यासाठी वर्गात रंगीत पताका, म्हणी, निसर्गरम्य, पक्ष्यांची प्राण्यांची चित्रे तसेच थोर नेत्यांची चित्रे लावावीत. कचऱ्यासाठी सुशोभित डबा करून त्यावर ‘माझा खाऊ मला द्या’ असे लिहून ठेवावे. याशिवाय वर्गातील फळ्यावर सुंदर अक्षरात डाव्या भागाला वर्गविभाग, पटावरील संख्या व उपस्थित विद्यार्थी. अनुपस्थित विद्यार्थी लिहावे. फळ्याच्या मध्य- भागाच्या वर ‘स्वयंमूल्यमापनातून सवयंविकास’ ही म्हण लिहावी. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सौर्यदृष्टी, सहकार्य, स्वच्छते मूल्ये, सर्जनशीलतेला, कल्पकतेला वाव मिळेल.

(२) वृक्षारोपण व वृक्षदिंडी
विद्यार्थ्यांना प्रथमत: काही रोपे आणावयास सांगावीत. नंतर ती विद्याथ्र्यांच्या हातात देऊन काही विद्याथ्र्यांच्या हातात टाळ, मृदंगासह पालखीत बसून जाणीव-जागृती व्हावी म्हणून शहरातून भव्य मिरवणूक काढावी. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती वृक्षावर आधारित घोषणावाक्ये द्यावीत, जसे ‘जैसा हिरा कोंदणात, तैसा वृक्ष अंगणात’, ‘जंगल बचाव, मानव बचाव’, ‘वृक्ष लावा, निसर्गराखा’, ‘वनस्पतीत हृदय असते’ -जगदिशचंद्र बोस’, ‘तुळशी पुष्पाहुनी आगळी, वृंदावनी मिरविली. तुळशीचे रोप लावील जो आणुनी, तया चक्रपाणी न विसंबे -श्री संत नामदेव,

तसेच शालेय प्रांगणातील मोठ्या व भव्य फलकावर गीते लिहावीत. जसे ‘ऋतु सोहळे नाजूक पाने कोकिळ गाणे रंगबिरंगी फुले उधळित उधळित अंबारीतून वसंत राजे आले. ‘ऋतुसंगे बोलू ऋतूंना विचारू या गं ऋतुसंगे – बोलू निरागस कळ्या आम्ही नभाखाली फुलू’, ‘अशी असावी शाळा किलबिलणाऱ्या पक्ष्यांसंगे मुक्त प्रार्थना गावी, चिंचा, पेरू, कैऱ्यांची पण रोज हजेरी घ्यावी. हातामधले पेरू बघुनी पोपट व्हावे गोळा, छप्पर भिंती खडू फळ्याविण अशी असावी शाळा’, ‘जीवनाहून प्यारे फुले, पशु, पक्षी, झाडे चंद्र, सूर्य तारे सख्खे मित्र अमुचे आम्हा जिवाहुन प्यारे.

रोपटे हातात घेऊन असलेल्या विद्यार्थ्यांयांची वृक्षदिंडी शहरातून शालेय प्रांगणात आल्यावर त्यांचे शाळेतील मुख्य व्यक्तींनी स्वागत करावे. शाळेच्या व्यवस्थापनाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी नंतर शाळेत वृक्षारोपण करावे. शाळेतील सुद्धा काही गरीब विद्यार्थ्यांना रोपटे भेट करावे की ते स्वतःच्या घरी लावू शकतील व ते रोपटे पाहून त्याची निगा राखून सतत वृक्षारोपणाची वृक्षसंवर्धनाची भावना जागृत राहील.

यानंतर सर्व विद्याथ्र्यांना प्रतिज्ञा घ्यावयास लावावी. ‘शपथ आज घेतो आम्ही चंद्र चांदण्यांची, शपथ आज घेतो आम्ही ऊनपावसाची, शपथ आज घेतो आम्ही पर्यावरण संरक्षणाची म्हणूनच आज हमी देतो निरोगी आरोग्य जीवनाची.’

याशिवाय शालेय परिसरातील वृक्षांना ट्रीगार्डस लावून त्यांचे संगोपन व संवर्धन करावयास सांगावे.

पर्यावरणदिन व पर्यावरण सप्ताह साजरे करणे-
यात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करावेत. उदा. ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे. या तारखेच्या आसपास ‘पर्यावरण सप्ताह पाळला जातो. या दिवशी व पर्यावरण सप्ताहात स्पर्धेचे आयोजन करावे व स्पर्धेचे विषय हे पर्यावरणावर आधारित असावेत. जसे वक्तृत्व स्पर्धेचा विषय ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, ‘वृक्ष माझा सखा’ ‘वृक्षांनाही जीव असतो’ असे अनेक विषय सांगता येतील. वादविवाद स्पर्धेसाठी ‘पर्यावरणाचे संतुलन पर्यावरण शिक्षणातून राखणे ही काळाजी गरज’ असे विषय ठरविता येतील. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये याची जागृती येईल तसेच या दिनी काही प्रमुख भाषणे ठेवावीत.

भाषणाच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, केरकचरा, सांडपाणी, बिडी सिगारेट, प्रदूषणाचा मुलांच्या आरोग्यावर, वनस्पतींवर होणारा दुष्परिणाम, वनस्पतीचे कार्य या अनेक विषयांतून विद्यार्थ्यांना माहिती द्यावी.

लोकसंख्या आणि पर्यावरण या एकाच नाण्याच्या हवी. दोन बाजू आहेत. त्यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता कायम ठेवून लोकसंख्या नियंत्रण करणे गरजेचे आहे याचीही माहिती द्यावी.

विविध प्रकारची जी प्रदूषणे आहेत की ज्यामुळे पर्यावरणाचा असमतोल बिघडतो त्या प्रत्येक प्रदूषणाबद्दलची, कारणांची, परिणामांची माहिती देण्यात यादी. त्या पर्यावरण सप्ताहात केवळ पर्यावरण व्यवस्थापनासाठी विविध सूचना, जसे- तुम्हाला जर दिर्घायुषी व्हायचे असेल तर मोठे आवाज कमी ऐका, हळू बोला, निरर्थक बडबड करू नका. कमी बोला, सावकाश बोला, मोजकेच बोला, व्हिडिओ, चित्रपट, टीव्ही, व्हीसीआर यांचे आवाज कमी करून ऐका, इ.

नोबेल पारितोषिक विजेते डॉ. रॉबर्ट कॉक यांनी असे मत व्यक्त केले की, असा एक दिवस येईल की, जेव्हा स्वास्थ्याचा आणि आरोग्याचा सर्वांत वाईट शत्रू म्हणून मानवाला निर्दय गोंगाटाशी निकराचा सामना करावा लागेल. यासाठी वायुप्रदूषण, जलप्रदूषण, केरकचरा यांतून प्रदूषण, कीटकनाशके व तृणनाशकांमधून प्रदूषण, ध्वनी प्रदुषण, अनुत्सर्गी प्रदूषण अशा अनेक प्रदूषणांची परिणामांची माहिती देऊन या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सजग करण्याची आवश्यकता आहे.

सजग व जागरूक कार्यक्रम-
पर्यावरणाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांला काही कार्यक्रमांतून सजग व जागरूक करावयास पाहिजे. त्यासाठी त्यांना प्रदूषणाच्या धोक्याविरुद्ध लढाई कशी द्यावयाची यासंबंधीची माहिती द्यावयास पाहिजे..

आपण जर हवा, पाणी आणि जमीन यावरील प्रदूषण रोखू शकलो तर जादूची कांडी फिरवावी तसे हे जग आनंद व सुखसमृद्धीने भरलेले भासेल. त्यासाठी विद्याथ्यांना खालील बाबी सांगाव्या लागतील.

(1) प्रदूषण थांबवण्यासाठी शिस्त आणि दृढनिश्चय
यांची फार आवश्यकता आहे.
(२) प्रदूषण थांबवण्यासाठी नियमित प्रयत्न व
काटेकोर नियमांचे पालन करावयास पाहिजे. ३)चांगल्या गोष्टी करायची सवय लावून घ्यायला हवी.
(४) टाकाऊ वस्तू इतरत्र न टाकता कचरा कुंड्यातच टाकल्या पाहिजेत.
(५) प्लॅस्टिकच्या बॅगा आणि बाटल्या यांचा वापर कमी
करायला पाहिजे.
(६) प्रदूषण रोधक उपकरण बसविलेलेच स्वयंचलित
वाहन विकत घेण्याचा आग्रह धरला पाहिजे.

यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या सभोवतालच्या झाडांची कार्ये समजावून सांगावीत,
(1)प्रदूषित हवेत शुद्ध हवा मिसळून झाडे तिचा दूषितपणा कमी करतात.
(२)झाडे आपल्या आजूबाजूला हवेत तात्पुरती स्तब्धता निर्माण करतात, त्यामुळे दूषित कण जमिनीवर उतरतात,
(३) झाडे हवेतील विषारी कण पकडून ठेवतात
(४) झाडे दुर्गंधीयुक्त हवा सुगंधी करतात.
(५) झाडे दूषित हवेत जास्त प्राणवायू सोडून ती शुद्ध
करतात.
(6) झाडे हवेला धुऊन स्वच्छ करण्याचे काम करतात.
(७)झाडे कारखान्याचे आणि वसाहतीचे सौंदर्य
वाढवतात.
(८) झाडांमुळे तापमानाची तीव्रता कमी होते. त्यामुळे थंड आणि उत्साहवर्धक हवा तयार होऊन लोकांची कार्यक्षमता वाढते.

वरील महत्त्वाची कार्ये करुण झाडे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे आपल्या सरकारने अरण्यवाढीवर भर दिला आहे व हे पर्यावरण व्यवस्थापना- साठी आवश्यक आहे.

शैक्षणिक सहल -विद्यार्थ्यामध्ये बाह्यजगात वावरण्याचे चातुर्य अंगी येण्यासाठी व पर्यावरण शिक्षणाच्या अभ्यासासाठी पर्यटनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. वस्तुतः मनुष्य हा निसर्गप्रेमी असल्यामुळे त्यांना आपल्या अंगणात पुष्पवाटिका कशी तयार करावी व तिची लागवड, निगाव वाढ कशी करावी याबद्दलची जाणीव व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, समुद्रतट व धरणे पाहण्यासाठी महाबळेश्वर माथेरान गणपतीपुळे. प्रतापगड सिंहगड, पन्हाळगड, जायकवाडी प्रकल्प, नागझिरा अभयारण्य इ. पाहण्यासाठी सहलीचे नियोजनबद्ध आयोजन करावे.

समर्थ रामदासांनी म्हटले आहे की,केल्याने देशाटन | होतील शहाणे सकळ जन|

सहलींच्या उपक्रमामुळे त्यांना निसर्गातील बाबींची माहिती मिळेल. राष्ट्रप्रेम, सहकार्य, बंधुता, करुणा, भूतदया व निसर्ग प्रेम वद्धिगत होण्यास मदत होईल.

पर्यावरण संवर्धन कृती कार्यक्रम-
हजारो शब्दांपेक्षा एक आकृती महत्त्वाची असते तर हजार जाकृत्यापेक्षा एक कृती महत्वाची असते असे पर्यावरण शिक्षणाच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत म्हणता येईल. केवळ तात्विक पाठिंबा देणारे आणि शब्दजालाने लोकांना मोहित करणारे तथाकथित तज्ज्ञ पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात कुचकामी ठरतील.पर्यावरण संवर्धनावर उत्तम भाषण, देणाऱ्या विद्वानांच्या तुलनेत ‘चिपको आंदोलना त वृक्षाला वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता वृक्षाला बिलगणारी गौरा’ नावाची अडाणी स्त्री जास्त श्रेष्ठ तरते. ही बाब महत्त्वाची आहे. ‘गाव तेथे जंगल, घर तेथे परसबाग आणि शाळा तेथे उद्यान’ असे कृतीशील उपक्रम शाळेत भविष्यात महत्त्वपूर्ण ठरतील. वृक्ष हा प्रत्यक्ष परमेश्वर असल्यामुळे भविष्यात इंचभरही वृक्षलागवडीयोग्य क्षेत्र रिकामे राहणार नाही याची दक्षता आपणास घ्यावी लागेल.

शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर ‘पर्यावरण पथके’, ‘पर्यावरण सेवा”.. ‘पर्यावर मंडळे तसेच ग्रामीण पातळीवर पर्यावरण वाहिनी’ यांसारखे संरक्षक गट निर्माण करणे आवश्यक आहे. पर्यावरण मंडळाच्या माध्यमातून ‘वृक्षमित्र’, ‘कल्पवृक्ष’, ‘स्मृतिवृक्ष’, यांसारख्या योजना सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून राबविणे ही खरी काळाची गरज आहे.

पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी समर्पित अशी पिढी तयार व्हावी इतकी व्यापकता शालेय शिक्षणात आणावी लागेल. पर्यावरण हा आपला पूर्वजांचा घरचा आणि भावी पिठ्यांचा अनमोल असा ठेवा असून आपण हा खनिजा सांभाळणारे केवळ विश्वस्त आहोत, इतपत भावनिक विचार साध्य करण्याइतके पर्यावरण व्यवस्थापन सक्षम असले पाहिजे. निसर्गामध्ये कमीत कमी ढवळाढवळ करून निसर्गावर जीवापाड प्रेम करणारी, निसर्गाचा आदर करणारी पिढी घडविण्याइतपत मोठा आवाका पर्यावरण व्यवस्थापनाचा असला पाहिजे. निसर्गसंगत कार्य करणे
पुण्य तर निसर्गाच्या विरोधात जाणे पाप आहे, ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या, नागरिकाच्या मनात, शालेय शिक्षणात निर्माण करता आली पाहिजे. पाप- पुण्याची कल्पना म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणे नव्हे .कारण भारतीय नागरिकांच्या मनात अजूनही या भावनेला स्थान आहे. ते यासाठी की, आपल्या मनाच्या विरुद्ध, जनहिताच्या विरोधात जाऊन आपल्या हातून काहीही विपरीत केले जाऊ नये या विचाराशी संबंधित ही पापाची कल्पना असून पर्यावरणाशी संबंधित सर्व चांगल्या कृती व करणे ही पुण्याची कल्पना इथे अपेक्षित आहे. तेव्हा ही भावना सर्वांमध्ये सर्वांनी निर्माण करणे आणि योग्य पर्यावरण व्यवस्थापन करणे हे प्रत्येकाचे निजीकर्तव्य व आजची काळाची गरज आहे हे निश्चित..
श्री प्रकाश विठोबा कानूरकर अध्यक्ष, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र जिल्हा सिंधुदुर्ग

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
https://sanwadmedia.com/99114/

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा