You are currently viewing जल जीवन मिशन जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल जाहीर

जल जीवन मिशन जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल जाहीर

जल जीवन मिशन जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल जाहीर

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार बक्षिस वितरण

सिंधुदुर्गनगरी,

 जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला, वक्तृत्व व लघुचित्रपट स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. विजेत्या स्पर्धकांना दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण हस्ते गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे  (पाणी व स्वच्छता) उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता प्राथमिक व माध्यमिक गटात निबंध व चित्रकला तर  ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालय गटात वक्तृत्व स्पर्धा तर खुल्या गटात लघुचित्रपट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे. तर लघुचित्रपट स्पर्धेचे परिक्षण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत समितीच्या माध्यमातुन करण्यात आले आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे, सुयश सदगुरु साटेलकर, न्यू इंग्लिश स्कुल आचरा, खुशी हनुमंत नाईक, जि.प. शाळा पडतेवाडी कुडाळ, नव्या संतोष राऊळ, जि.प. शाळा शिरशिगे सावंतवाडी यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. तर माध्यमिक गटात प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे, पर्णिका हनुमंत नाईक, कुडाळ हायस्कुल कुडाळ, राज्ञी विवेक कुलकर्णी, शेठ म. ग. हायस्कूल देवगड, मैथिली सुनिल सावंत, भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव, सावंतवाडी यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये  21000/-, 11000/-, 5500/-   सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे,  तेजस्वी आनंद मैस्त्री, जि. प. शाळा मसुरे देऊळवाडा, मालवण, मोहित निळकंठ सुतार, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, ओम किशोर चव्हाण, सरंबळ इंग्लिश स्कुल, कुडाळ यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. तर माध्यमिक गटात निशात प्रसाद राणे, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, प्राजली विश्वास कदम, शिरगाव हायस्कुल देवगड, निधी दिलीप कदम, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये २१०००/-, ११०००/-,५५००/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्युनिअर गटात प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे सौम्या संदेश मणेरकर, सरस्वती विद्यालय कुडासे दोडामार्ग, श्रध्दा सत्यवान मडव, शिवाजी इंग्लिश स्कुल, जाभवडे कुडाळ, श्रध्दा लक्ष्मण नेमणे, पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. तर सिनिअर गटात शेफाली नारायण कशाळीकर, संत राऊळ महाराज महाविद्यालम कुडाळ, श्रावणी संजय गावडे, स.का. पाटिल महाविद्यालय मालवण, रिध्दी बाळकृष्ण कदम, श्री. स.ह. केळकर महाविद्याल देवगड यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये 21000/-, 11000/-,5500/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय खुल्या लघुचित्रपट स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे विनोद दळवी, संतोष बादेकर, अनिकेत मिठबावकर यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये 31000/-, 21000/-,11000/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित स्पर्धाचा बक्षिस वितरण कार्यक्रम दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता ईच्छापुर्ती गोविंद मंगल कार्यालय, ओरोस मुबंई- गोवा हायवे नजिक आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे (पाणी व स्वच्छता) उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे. तरी सर्व विजेत्या स्पर्धकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन त्यानी यावेळी केले आहे.

 

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा