You are currently viewing घावनळे नमसवाडी येथील केंद्र शाळेतील एलईडी टिव्ही सह अन्य साहित्य चोरीस

घावनळे नमसवाडी येथील केंद्र शाळेतील एलईडी टिव्ही सह अन्य साहित्य चोरीस

कुडाळ

घावनळे नमसवाडी येथील बंद असलेल्या जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक केंद्र शाळेतील एलईडी टिव्ही सह अन्य किमंती साहीत्य मिळुन सुमारे सुमारे 4 हजार 700 रु. च्या मुद्देमालाची चोरी अज्ञात चोरट्यांने केली असल्याची तक्रार कुडाळ पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. सदरची ही चोरी गेल्या दोन दिवसात केली असल्याचा अंदाज प्राथमिक तपासात व्यक्त केला जात आहे.
ये प्रकरणी त्या शाळेतील एक शिक्षका यांनी तक्रार दिली की, सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने शाळा बंद आहेत. घावनळे नमसवाडी येथील शाळा ही बंद आहे. दरम्यान या शाळेत शालेय कामानिमित्त दि. 4 एप्रिल रोजी या ठिकाणी शिक्षक, शिक्षिका आले होते. त्यावेळी त्यांनी शाळा बंद करून गेले तेव्हा शाळेतील साहीत्य सुस्थितीत होते. मात्र शुक्रवारी शाळेत एक शिक्षिका आली असता त्यांना शाळेची एक लाकडी खिडकी उचकटुन काढलेली दिसुन आली. तसेच शाळेतील एलईडी टिव्ही व इतर किमंती साहीत्य गायब झालेले दिसुन आले.
या प्रकरणी त्या शिक्षकीने कुडाळ पोलिस ठाण्यात शाळेत चोरी झाली असल्याची तक्रार दिली. या चोरीत चोरट्यांने शाळेची खिडकी तोडत प्रवेश करीत शाळेतील एल ई डी टिव्ही, दोन स्पिकर बाँक्स व एक गुलाबी रंगाचा 100 फुट पाण्याचा पाईप असा मुद्देमाल मिळुन सुमारे 4 हजार 700 रु. च्या साहित्याची चोरी केली.
या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 11 =