You are currently viewing सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार

सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सैनिक नागरी सहकारी पतसंथा मर्या. सिंधुदुर्ग या संस्थेला महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन मुंबई यांच्याकडुन दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार पनवेल मुंबई येथे राज्य महिला आयोग अध्यक्ष मा. रुपालीताई चाकणकर, मा. आमदार अदिती सुनिल तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सन १९९१ मध्ये मुहुर्तमेढ रोवलेल्या या संस्थेने रुपये ३६,००० पासून १५० कोटीपर्यंत ठेवी गोळा करण्यापर्यंत दैदित्यमान यश संपादन केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने व्हिजन २०२५ कार्यक्रमा अंतर्गत २०० कोटी ठेवी गोळा करण्याचा संकल्प सोडला असुन त्या दृष्टीने संस्थेची वाटचाल अगदी जलद गतीने सुरु आहे.

महिला सबलीकरण व सक्षमीकरण : संस्थेच्या संचालक मंडळाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील महिला सक्षम व्हावी व तीने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा यासाठी महिला सवलीकरण व सक्षमीकरण या योजनेअंतर्गत महिलांना हिरकणी कर्ज योजनेव्दारे कर्ज पुरवठा करून त्यांना आर्थिक स्तोत्राचे एक हक्काचे दालन सुरू करून दिलेले आहे. या योजनेस सुरुवातीपासुनच प्रचंड प्रतिसाद लाभला असुन मोठ्या प्रमाणात महिला या आर्थिक दृष्टया सक्षम होत आहे.

विविध ठेवीवर आकर्षक व्याजदर : संस्था देत असलेल्या विविध ठेवीवर आकर्षक व्याजदर रौप्य धनलक्ष्मी बॉण्ड योजनेवर हमखास मिळणारी लकी ड्रॉ द्वारे वक्षिसे. यामुळे जिल्हयातील ग्राहक संस्थेला पहिली पसंती देत आहेत.

संस्था दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असुन संस्थेने चित्रकला, वकृत्व व ट्रि कमिनयुक्त दशावतार स्पर्धा, गंगोळी स्पर्धा, व्यावसायिक मार्गदर्शन गवेप नाट्य स्पर्धा, गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धा राबविल्या असून सिंधुदुर्ग जिल्हायात सांस्कृतीक वारसा जपण्यासाठी हातभार लावण्याचे काम संस्था करत आहे.

संचालक मंडळाचे धोरणात्मक निर्णय : संस्थेच्या संचालकांनी घेतलेल्या भविष्य कालीन धोरणी निर्णयामुळे व कर्मचारी देत असलेल्या योगदानामुळे उत्कृष्ट व्यवस्थापन राष्ट्रीयकृत बँकाच्या तोडीला देण्यात येणा-या विविध योजनांची होत असलेली प्रभावीपणे अंमलबजावणी यामुळे संस्थेचा आलेख सतत चढता राहत आहे.. संस्थेने जिल्हयात स्वतःची पत निर्माण केली असुन जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा सहकार्याच्या जोरावर स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे.

सोने तारण कर्ज योजना : संस्थेकडुन सोनेतारण कर्ज योजनेतून कर्ज घेणा-या सभासदाच्या कर्ज रक्कमेवरोवर आकर्षक भेटवस्तुही लाभ मिळु शकतो. यासाठी रु.५०००/- पेक्षा कर्ज रक्कमेची उचल होणे आवश्यक आहे.

संस्थेकडुन बँकेप्रमाणे इतर अत्याधुनिक सुविधा :- संस्थेच्या सर्व शाखा हया CBS प्रणालीवरोवर चालु असुन वेंकाप्रमाणे RTGS / NEFT / QR कोड व मोवाईल बँकिंग व इतर आवश्यक सुविधा हया संस्थेकडुन देण्यात येतात.

कार्यक्षम व्यवस्थापन :- सांस्थेचे संचालक मंडळ व कर्मचा-यातुन कार्यक्षम व्यवस्थापन केले जात असुन संस्थेच्या खातेदाराला जलद व तत्पर सेवा दिली जाते.

संस्थेला पुरस्कार जाहिर करताना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनच्या संचालकांनी संस्थेच्या विविध स्तरांचा व सेवांचा अभ्यास केला असुन केवळ त्या गुणांकनावरच संस्थेला “आदर्श पतसंस्था ” हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सदर पुरस्कार ३० ऑक्टोबर रोजी क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके नाटयगृह पनवेल, मंबई येथे बहाल करण्यात आला. सदर पुरस्कार स्विकारताना संस्थेचे चेअरमन श्री. शिवराम गणेश जोशी, व्हा.चेअरमन श्री.हिंदवाळ भगवान केळुसकर, संचालक श्री. दिनानाथ सावंत, श्री. सुभाप सावंत, श्री. बाबुराव कविटकर, शाखा संचालक श्री. संतोप मुसळे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल राऊळ व इतर मान्यवर. सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे सर्व स्तरावर अभिनंदन होत असुन संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी व उत्कृष्ट व्यवस्थापन यांचे हे सर्व फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − two =