You are currently viewing ४ नोव्हेंबरला श्रीराम राज्य रथयात्रेचे कणकवलीत आगमन

४ नोव्हेंबरला श्रीराम राज्य रथयात्रेचे कणकवलीत आगमन

कणकवली

श्रीराम राज्य रथयात्रेचे कणकवली येथे शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी आगमन होणार आहे. सदर रथयात्रेच्या स्वागतासाठी सर्व भक्तांनी आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे दुपारी 12:30 वाजेपर्यंत उपस्थित रहावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी जिल्हा सेवा विभागप्रमुख नंदकुमार आरोलकर, जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव सावंत यांनी केले आहे.

श्रीराम राज्य रथयात्रा 2022 ही विजयादशमी 5 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू झालेली असून संपूर्ण भारत व नेपाळ असा 60 दिवसांचा प्रवास पूर्ण करून गीता जयंती 3 डिसेंबर 2022 ला यात्रेचे परत अयोध्येत समापन होईल. या यात्रेचे नेतृत्व शक्ती शांतानंद महर्षी हे करीत आहेत. ही यात्रा 4 नोव्हेंबर रोजी कणकवली येथे येत असून रथयात्रेच्या स्वागतासाठी हार, फुले, प्रसाद इत्यादी व्यवस्था करायची असून या स्वागत यात्रेचा दुर्मिळ योग चुकवू नये असे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल दुर्गावाहिनी जिल्हा सेवा विभागप्रमुख नंदकुमार आरोलकर, जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + nine =