You are currently viewing कोलगाव येथे दुचाकी आणि ट्रक अपघातात दुचाकीस्वार जखमी

कोलगाव येथे दुचाकी आणि ट्रक अपघातात दुचाकीस्वार जखमी

सावंतवाडी

दुचाकी आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात कोलगाव येथे सायंकाळच्या दरम्यान घडला. अधिक उपचारासाठी जखमीला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकी चालक सावंतवाडीहुन कणकवलीकडे जात असताना त्याने कुडाळहून चंदगडकडे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. यामध्ये दुचाकीचालक सुयोग दयासागर पालव (३०) गंभीर जखमी झाले आहेत. अधिक उपचारासाठी जखमीला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा