You are currently viewing शाळांना दिवाळीच्या कालावधीत सुट्टी जाहिर करा…

शाळांना दिवाळीच्या कालावधीत सुट्टी जाहिर करा…

प्रथम सत्राच्या आकारिक व संकलित मूल्यमापनासाठी सक्ति नको – संतोष पाताडे

कोविड १ ९ च्या वाढत्या प्रार्दुभावामुळे १५ मार्च पासून शाळा बंद आहेत. सदर कालावधतीत “शाळा बंद पण शिक्षण सुरू ” हा उपक्रम शिक्षक प्रभावीपणे राबवीत असून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवलेले आहे. तसेच कोविड १ ९ च्या वाढत्या प्रार्दुभावाच्या काळात विलगीकरण कक्ष व्यवस्थापन ड्युटी,  चेकपोस्ट वरील ड्युटी दि . ०८ मे २०२० ते १४/१०/२०२० पर्यंत शिक्षकांनी प्रामाणिकपणे बजावलेल्या आहेत. सध्या ऑफलाईन, ऑनलाईन, तसेच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, तसेच शिक्षक मित्राद्वारे विद्यार्थ्यांचं शिक्षण सातत्यपूर्ण सुरु आहे. दरम्यानच्या कालावधीत शिक्षक जिल्ह्याबाहेरील आपल्या नातेवाईकांच्या बऱ्या बाईट प्रसंगानिमित्त जिल्ह्याबाहेर गेलेले नाहीत. शिवाय काही शिक्षकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे नियमित औषधोपचार देखील परजिल्ह्यातील डॉक्टरांकडे सुरु आहेत. त्यांच्या नियमित तपासण्या करून घेण्यासाठी देखील शिक्षक जिल्ह्याबाहेर जाऊ शकलेले नाहीत. तरी दि . १३/११/२०२० ते ३०/११/२०२० या कालावधीत शिक्षकाना कोणतेही प्रशासकीय काम न देता दिवाळीची सुट्टी जाहीर करावी व दिवाळीनंतर पुन्हा नव्या उत्साहाने शिक्षण प्रक्रिया सुरु करावी.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद असून त्या केंव्हा सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे. तरी शासनाच्या निर्देशानुसार ‘ शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमांतर्ग विदयार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे काम शिक्षकांनी प्रामाणिकपणाने सुरु ठेवलेले आहे. शासनाने दिलेल्या संदर्भीय पत्रानुसार शाळा सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या होत्या. परंतु सदर कालावधीतीत कोविड १९चा वाढता प्रादुर्भाव सुरु होता. तसा आजही सुरू आहे . शाळा सुरु करून अध्यापन करण्यास पालकांचा विरोध होता. तसेच शिक्षकांची आपत्ती व्यवस्थापनासाठी सेवा वर्ग केलेली होती. शिक्षक विलगीकरण कक्ष व चेकपोस्टवर ड्युटीसाठी कार्यरत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता नेटवर्कची समस्या आजही तशीच आहे. त्यामुळे आपण दिलेल्या संदर्भिर्य शासन परिपत्रकाप्रमाणे सर्व मुलांना पूर्ण क्षमतेने ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण मिळालेले नाही. त्यामुळे आकारिक व संकलित मुल्यमापन वस्तुनिष्ठ करणे शक्य होणार नाही. तसेच सध्याच्या प्राप्त परिस्थितीत तशा प्रकारचे आकारिक व संकलित मूल्यमापन करणे अशक्य आहे. आणि प्रथम सत्राचे आकारिक व संकलित मूल्यमापन करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. महाराष्ट्र शासनाचे मुल्यमापन कारण्यासंदर्भात निर्देश आल्यानंतर प्रशासनाकडून मूल्यमापनबाबत सूचना मिळाव्यात. अशी निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने मा. एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी संघटनेला चर्चेसाठी वेळ देऊन, संघटनेच्या दोन्ही मागण्या संदर्भात सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले. या भेटी प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती प्राथमिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष -दयानंद नाईक, संतोष पाताडे -जिल्हाध्यक्ष. अरूण पवार – जिल्हासचिव, लहू पाटील, संतोष कोचरेकर, सखाराम झोरे, विनेश जाधव, मनोज गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 18 =