You are currently viewing वेंगुर्ल्यात ११ रोजी स्वरसंध्या कार्यक्रम…

वेंगुर्ल्यात ११ रोजी स्वरसंध्या कार्यक्रम…

वेंगुर्ल्यात ११ रोजी स्वरसंध्या कार्यक्रम…

वेंगुर्ला

वेंगुर्ला येथील तबलापटू कै.रमेश मेस्त्री यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शनिवार दि. ११ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता विठ्ठल मंदिर, माणिकचौक येथे ‘स्वरसंध्या‘ हा शास्त्रीय संगीत, भक्तिगीत, भावगीत, नाट्यगीत व अभंग गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

यावेळी योगेश बोरचाटे, विजय मेस्त्री, पल्लवी पिळणकर, ओजस्वी पिळणकर, ऋषा पिळणकर आदी गायक गायन सादर करणार आहेत. यांना जस्मित पिळणकर (तबला) तर पल्लवी पिळणकर (हार्मोनियम) हे साथ करणार आहेत. तसेच अंधत्वावर मात करीत जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तबला, हार्मोनियम व गायन या तिन्ही क्षेत्रात ‘विशारद‘ पदवी मिळविलेले वडखोल येथील सचिन पालव हे सुद्ध यावेळी आपली कला सादर करणार आहेत. तरी रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक महादेव मेस्त्री यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा