You are currently viewing हुंबरट येथे महामार्गावर कारची रिक्षेला जोरदार धडक…

हुंबरट येथे महामार्गावर कारची रिक्षेला जोरदार धडक…

कणकवली

महामार्गावर ​हुंबरट येथे कारची रिक्षेला धडक बसली. यात ​हुंबरट येथील रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ​हुंबरट बेळगाव गॅरेज समोर ​​आज दुपारी २ वा​.​ च्या सुमारास घडला. अपघातानंतर जखमी रिक्षाचालकाला कणकवलीत उपचारासाठी हलविण्यात आले. कारची रिक्षेला धडक एवढ्या जोरात बसली यात रिक्षा महामार्गावर पलटी झाली. अपघातानंतर ​ग्रामस्थांनी धाव घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा