You are currently viewing कणकवली नगरपंचायतीला २३ कोटी २० लाखाचा निधी मिळणार…

कणकवली नगरपंचायतीला २३ कोटी २० लाखाचा निधी मिळणार…

नितेश राणेंकडून “दिवाळी बंपर” निधीची भेट…

कणकवली

महाविकास आघाडीने कणकवली शहराच्या विकासाची अनेक कामे अडवून ठेवली होती. निधी देण्याबाबतही दिरंगाईचे धोरण अवलंबले होते. मात्र आमदार नीतेश राणे यांच्या पाठपुराव्यातून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या सरकारने कणकवली नगरपंचायतीसाठी २३ कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजूर केला असल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज दिली.
येथील नगराध्यक्ष दालनात श्री.नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, किशोर राणे, महेश सावंत आदी उपस्‍थित होते. श्री.नलावडे म्‍हणाले, कणकवली शहराच्या अनेक विविध विकासकामांच्या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत वर्षा या निवासस्थानी भेट घेत त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मागील सरकारच्या काळात हेतू पुरस्करपणे कणकवली नगरपंचायत ला विकास कामांचे निधी देणे डावलले जात होते. त्यामुळे आता असलेल्या युती सरकारच्या माध्यमातून कणकवली शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा व अनेक समस्या मार्गी लागाव्यात या अनुषंगाने ही भेट घेत चर्चा करण्यात आली
श्री.हर्णे पुढे म्हणाले, कणकवली शहरातील रस्त्याकरिता सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. तर नागरी सुविधा योजनेअंतर्गत अजून स्वतंत्रपणे पाच कोटींचा निधी द्या अशी मागणी देखील आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यावेळी करण्यात आली. कणकवली नगरपंचायतचा मंजूर असलेला स्टाफ पॅटर्न बाबत देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. मंजूर दहा पैकी जवळ दोनच पदे सध्या नगरपंचायत मध्ये कार्यरत आहेत. आठ पदे रिक्त असल्यामुळे त्याचा कणकवली नगरपंचायतच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या आदेश प्रशासनाला दिले. तसेच स्टाफ पॅटर्न बाबतही योग्य ती कार्यवाही तातडीने करा व तातडीने प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी द्या अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.
श्री.नलावडे म्‍हणाले, राज्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांची देखील भेट घेत चर्चा करण्यात आली. यामध्ये पर्यटन विकास दृष्ट्या कणकवली शहर विकसित करण्यासोबत चर्चा करत असताना कणकवली शहरातील २७/ २८ क्रमांक चे आरक्षण विकसित करण्यात करिता अजून १० कोटी रुपयांची निधीची आवश्यकता आहे. टप्पा १ विकसित केले असले तरी अजून दोन टप्प्यांमधील काम बाकी आहे. याकरिता १० कोटींचा निधी द्या. अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कणकवली गणपती साणा येथे धबधब्याचा मंजूर करण्यात आलेला प्रकल्प लवकरच मार्गी लावण्याच्या दृष्टीने लक्ष वेधण्यात आले. या कामाकरिता अडीच कोटी रुपयांचा निधी व २७/ २८ आरक्षण मधील गार्डनच्या कामाकरता ८० लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून तातडीने मंजुरी द्या अशी चर्चा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली. व तसा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.
आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून पालकमंत्र्यांमार्फत या निधीला चार नोव्हेंबर च्या बैठकीत मंजुरी दिली जाणार असल्याचे श्री हर्णे म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेनुसार एकूण २३ कोटी २० लाखाची दिवाळी बंपर भेट कणकवली वासियांना या बैठकीतून मिळाल्याची माहिती श्री हर्णे व नलावडे यांनी दिली. लवकरच रीतसर प्रक्रिया पूर्ण होऊन या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळेल व ही कामे मार्गी लागतील असे देखील श्री नलावडे, व हर्णे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + three =