You are currently viewing निवडणूकीसाठी जात पडताळणीचे अर्ज लवकरात लवकर सादर करण्याचे आवाहन

निवडणूकीसाठी जात पडताळणीचे अर्ज लवकरात लवकर सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी जात पडताळणीचे अर्ज लवकरात लवकर सादर करावेत असे आवाहन प्रमोद जाधव, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोध व प्रशिक्षण संस्था (बाटी), पुणे यांच्या मार्फत जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया दिनांक 1 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांसाठीही प्राप्त होणारे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अर्जदारांनी www.barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जांमध्ये परिपूर्ण माहिती भरून, आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे. अर्जदारांने ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रतिसह, जिल्हाधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारशीने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात परिपूर्ण अर्ज दाखल करणे गरजेचे आहे.

            सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम दिनांक अनुक्रमे 30 व 31 डिसेंबर अशी आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात समिती कार्यालयात विद्यार्थी व निवडणुकीचे उमेदवार यांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समिती कार्यालयात अपुरे मनुष्यबळ आहे. सद्या कोविड – 19 च्या महामारीच्या परिस्थितीत अभ्यगतांमध्ये सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करता नागरिकांची असुविधा होऊ नये यासाठी निवडणुकीचे जात पडताळणीचे अर्ज लवकरात लवकर सादर करुन सहकार्य करावे असे आवाहन प्रमोद जाधव, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 14 =