You are currently viewing भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘लर्न अँड ग्रो’ स्पर्धा ….

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘लर्न अँड ग्रो’ स्पर्धा ….

रविवार दि. 26मार्च रोजी आयोजन..

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लहान मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच शृंखलेचा एक भाग म्हणून रविवार, दि.26 मार्च रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत ‘लर्न अँड ग्रो’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा 5-7 व 8-10 अशा दोन वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली आहे. पाच ते सात वयोगटासाठी फिंगरप्रिंट कलरिंग स्पर्धा असेल. यामध्ये ब्रश किंवा खडू न वापरता हाताच्या बोटांचा वापर करून वॉटर कलरच्या सहाय्याने चित्र रंगवायचे आहे. आठ ते दहा वयोगटासाठी क्ले मॉडेलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये डेकोरेटीव्ह फिश हे मॉडेल बनवायचे आहे. यासाठी लागणारी क्ले शाळेतर्फे पुरविण्यात येईल. डेकोरेशनसाठी आवश्यक साहित्य स्पर्धकांनी आणायचे आहे.

तरी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे 25 मार्चपर्यंत 7448187189 / 9967740426 या क्रमांकावर नोंदवावीत. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व मुलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =