You are currently viewing मालवण शिवसेनेकडून वैभव नाईक यांचा सत्कार

मालवण शिवसेनेकडून वैभव नाईक यांचा सत्कार

मालवण शिवसेनेकडून वैभव नाईक यांचा सत्कार

जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून अभिनंदन; “सदैव तुमच्या पाठीशी” असा विश्वास

मालवण :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण येथील शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मालवण शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी “आम्ही सर्वजण सदैव तुमच्यासोबत राहून साथ देऊ,” असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मनोज मोंडकर, सिद्धेश मांजरेकर, नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगूत, तपस्वी मयेकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, गौरी मयेकर, पूजा करलकर, महिला शहरप्रमुख रशमी परुळेकर, चिंतामणी मयेकर, उपशहरप्रमुख लुडबे, उमेश मांजरेकर, सुरेश मडये आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा