You are currently viewing आचरा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

आचरा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

आचरा किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

सरपंच जेरोन फर्नांडिस यांचा पुढाकार; ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांचा सहभाग

मालवण

आचरा किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असल्याने समुद्रकिनारी प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढले होते. आचरा किनारा स्वच्छ व सुंदर राहावा यासाठी आचरा ग्रामपंचायतीचे सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने विशेष स्वच्छता मोहीम राबवून किनारा स्वच्छ केला.
या मोहिमेत उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, पूर्वा तारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब, गिरीश आपकर, रुपेश परब, सिद्धेश वराडकर, दयू बिनसाळे आदींसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
मोहिमेबाबत माहिती देताना सरपंच जेरोन फर्नांडिस म्हणाले, “आचरा किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून ‘स्वच्छ किनारा’ अशी आचऱ्याची ओळख कायम राखणे गरजेचे आहे. किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा हटवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. किनाऱ्यावर व्यवसाय करणाऱ्या ग्रामस्थांनीही आपली जबाबदारी ओळखून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी,” असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा