You are currently viewing फोंडाघाट मध्ये ११ kv च्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

फोंडाघाट मध्ये ११ kv च्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

फोंडाघाट मध्ये ११ केवीचे ट्रान्सफॉर्मर वर स्फोट होऊन वायर्स लोकल सर्विस वायर वर पडून लाखोंचे नुकसान !

टीव्ही- फ्रिज- वायरिंग- मोटर्स जळाले

फोंडाघाट

पाडवा, भाऊबीज, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, लोरे तिठा- हवेली नगर येथील भोगटे हॉटेलच्या मागे झरयेरवाडी कडून येणाऱ्या ११ केवीच्या ट्रांसफार्मर वर दुपारी १:३० दरम्यान मोठा स्फोट झाला.इन्सुलेटर डिस्क फुटून त्यांच्या वायर्स, रस्ता व घरगुती सर्विस वायर वर पडल्याने अचानक वाढलेल्या होल्टेज प्रवाहामुळे हवेलीनगर ते बाजारपेठ- राधाकृष्ण मंदिर पर्यंतच्या लाईन्स, वायर्स जळाल्या. घराघरातील वायरिंग जळले टीव्ही सेट- जळून खाक झाले.फ्रीज-डिफ्रिजर जळले. स्टेट बँक,कारखाने, घरातील वीज उपकरणे पेटली.नशिबाने कुठेही जीवित हानी झाली नसली, तरी या भागातील ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आणि दिवाळीच्या उत्साहावर- आनंदावर झालेल्या नुकसानामुळे, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.

याच लाईन वरून नजीकच्या पेट्रोल पंपाला विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी मेंटेनन्स कडे म रा वि म. ने दुर्लक्ष केल्यामुळे,हाय व्होल्टेज लाईन खाली गार्डनिंगची व्यवस्था नसल्यामुळे,ही घटना झाल्याचे उपस्थितानी सांगितले. अन्यथा हाय व्होल्टेज लाईनच्या वायर्स सर्विस लाईन्स वर पडल्या नसत्या. आणि वेळही आली नसती व नुकसानही झाले नसते.

त्यामुळे घटनास्थळी आलेल्या स्थानिक अधिकारी श्री कांबळे यांना उपस्थित नुकसानग्रस्त ग्रामस्थ- व्यापारी यांनी नुकसानीचे पाहणी करून झालेले नुकसानीच्या प्रश्नांचा भडीमार केला. मात्र भेदरलेल्या श्री. कांबळे यांनी ही घटना नैसर्गिक असल्याची सारवासारव करीत, आपण काहीही करा ? असे अरेरावीचे उत्तर दिले. वरिष्ठांना फोन लावणे ऐवजी, त्यांना फोन लागतच नाही– पंचनामे करण्यासाठी संबंधितांना कळवितो– अशी उत्तरे जमलेल्या ग्रामस्थांमध्ये चीड आणणारी होती.

मंडल अधिकारी दिलीप पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून, लवकरच कारवाई करण्याचे सांगून त्यांना शांत केले. प्रभारी तलाठी लांबर दिवाळी असूनही दोडामार्गहून घटनास्थळी पोहोचले. घटनेची तीव्रता संदेश पटेल यांनी तहसीलदार एम. एस. ई .बी .चे मोहिते- पाटील यांना कळविली.मात्र एम. एस.ई.बी चे कोणीही अधिकारी एवढी मोठी गंभीर घटना कळूनही संध्याकाळपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

संध्याकाळी पाच नंतर या परिसरातील लाईन्स वेगळ्या ट्रान्सफॉर्मरवर टाकून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, हा प्रक्षोभ जनतेमध्ये व्यक्त होत असताना, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि स्थानिक वीज मंडळाच्या साहेबांची वागणूक, याबद्दल तीव्र खेद व्यक्त होत आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई वीज मंडळांनी प्रोसिजर पूर्ण करून, तातडीने द्यावी– अन्यथा आंदोलनाचा इशारा संतप्त फोंडावासीयांनी दिला आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा