मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटना आक्रमक….

मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटना आक्रमक….

कुडाळ

मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेचा आक्रमक पवित्रा, नवोदय विद्यालयात सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 5 वी ची प्रवेश प्रक्रिया राबविताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास संघटना संघर्षपूर्वक लढा उभारणार आहे. गेल्या वर्षी नवोदय विद्यालयात परजिल्ह्यातील विध्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही शाळांमध्ये प्रवेश दाखवून नवोदयच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ केलं होत त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता. त्याची पुनरावृत्ती न होता यावर्षीची प्रवेश प्रक्रिया पारदशकपणे राबवावी यासाठी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आली. यावर्षीची प्रवेश प्रक्रियेत परजिल्ह्यातील विध्यार्थ्यांना जर कोणत्या शाळांनी नवोदयसाठीच फक्त 5 वी ला प्रवेश दाखवून गैरप्रकार करत असतील तर त्याची चौकशी लावून संभंधित यंत्रणेतील सर्व अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांना घरी बसविण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी संघटनेचे सल्लागार ॲड. सुहास सावंत, अध्यक्ष – दिनेश म्हाडगुत, सचिव- भाऊसाहेब महाडदेव, सदस्य श्रीकृष्ण सावंत, राणे मॅडम उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा