You are currently viewing पत्रकारीता पारदर्शक असली पाहीजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पत्रकारीता पारदर्शक असली पाहीजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पत्रकारीता पारदर्शक असली पाहीजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी

पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केलेलं लिखाण विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. पत्रकाराने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्या विषयातील समस्या मांडून त्यावर उपाय देखील लिखाणातून मांडणे आवश्यक आहे. पत्रकारिता पारदर्शक असली पाहीजे आणि ती पारदर्शकता टिकवून ठेवता आली पाहीजे असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघामार्फत आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले.

मराठी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या बाळशाखी जांभेकर स्मारक व पत्रकार भवन सभागृहात जिल्हा पत्रकार संधा मार्फत पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर ताबडे, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रमुख वक्ते तथा ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कुडाळ तह‌सीलदार अमोल पाठक, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, संघाच्या सचिव देवयानी वरसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, गणेश जेठे, संतोष वायंगणकर, नंदकिशोर महाजन, बाळ खडपकर, विद्याधर केनवडेकर, रमेश जोगळे, महेश सरनाईक, संतोष राऊळ, संतोष सावंत, महेश रावराणे, दाजी नाईक, संदीप देसाई, लघु, खरबत, महेश रावराणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजांचे काम कसे चुकीचे आहे हे मांडण्याचे कार्य केले. पत्रकारीता दर्पण प्रमाणे पारदर्शक पाहीजे. पुरस्कार दिल्यामुळे तुमची जबाबदारी वाढते, चुकीच्या घडत असलेल्या घटना नागरिकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी केले पाहीजे. देश महासत्ता बनत असतांना तरुणांनी काय केले पाहीजे याचे प्रबोधन होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री केसरकर  म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांचे भवन उभारण्याचे स्वप्न साकार झाले आहे. हे भवन म्हणजे बाळशास्त्री यांना खरी श्रद्धांजली आहे. त्यांचे जन्म गाव असलेल्या पोंभुर्ले गावाला पुस्तकांचे गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. शासकीय येाजना राबवताना पत्रकारांचे सहकार्य महत्वाचे आहे. पत्रकार भवनासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, गणेश जेठे यांनी विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाच्या सचिव देवयानी बरसकर यांनी केले. सुत्रसंचालन शुभम धुरी, मान्यवरांचे स्वागत उमेश तोरस्कर यांनी केले तर आभार संतोष सावंत यांनी मानले.

पुरस्कार वितरण –

जिल्हा पत्रकार संघा मार्फत वितरीत करण्यात आलेल्या अन्य पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार माधव कदम, ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवलीचे चंद्रशेखर तांबट, युवा पत्रकार पुरस्कार वैभववाडीचे श्रीधर साळुंखे, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरीचे नंदकुमार आगरे, कुडाळचे प्रमोद म्हाडगुत, वेंगुर्लाचे प्रथमेश गुरव, देवगडचे दयानंद मांगले यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, रोखरक्कम देऊन गौरविण्यात आले.

00000

 

Regards :

District Information Office,
Sindhudurg.
diosindhudurg@gmail.com
02362-228859

Pl follow us on : 

Twitter :  https://twitter.com/InfoSindhudurg

blog :  https://diosindhu.blogspot.com

Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100009944297016

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + five =