एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरच्या आयातीवर सरकार बंदीमुळे..चीनला मोठा फटका!!!

एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरच्या आयातीवर सरकार बंदीमुळे..चीनला मोठा फटका!!!

 

नवी दिल्ली :

 

देशी उत्पादनांना चालना देण्यासाठी एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे चीनला हा मोठा धक्का मानला जात आहे.परकीय व्यापार महासंचालकांनी याबाबत गुरूवारी उशीरा अधिसुचना काढली. त्यात स्प्लिट एसी यंत्रणा आणि रेफ्रिजेशनसहितच्या वातानुकुलीत यंत्रणेवर आयात बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले.

मुक्तपासून प्रतिबंधित वर्गात या वस्तू टाकण्यात आल्या आहेत. व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयाला मान्यता दिल्यानंतर याबाबतची अधिसुचना काढण्यात आली. सरकारने या पुर्वी दूरचित्रवाणी संचाच्या आयातीवर निर्बंध घातले होते. त्याच्या निर्यातदारांना डीजीएफटीकडून परवाना आवश्यक करण्यात आला आहे. भारतातील वातानुकुलीत यंत्रणेची मोठी बाजारपेठ आहे. सुमारे पाच ते सहा अब्ज अमेरिकन डॉलर्सची त्यात उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे.

*स्थानिक उत्पादकांना मोठी संधी*

आत्मनिर्भर योजनेत स्थानिक उत्पादकांना संधी मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. भारतीय उत्पादकांनी तक्रारी केल्यानंतर चीन मलेशिया आणि व्हिएतनाममधील क्लोनिकल क्लोराईडवर अँटी डम्पिंग कर लावण्याची शिफारस व्यापार महासंचालकांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा