You are currently viewing उत्कट

उत्कट

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांनी कवयित्री आ.शांता शेळके यांच्या शताब्दीपूर्ती निमित्ताने केलेले कविता रसग्रहण*

कवितेचं रसग्रहण

*शीर्षक:—उत्कट..*

शांता शेळके यांची उत्कट ही कविता उतारवयातल्या
पीढी विषयी प्रातिनिधीकस्वरुपात भाष्य करते.

इतके उत्कट होउन आता भागत नाही
अशा वयात कुणी असे वागत नाही।।

मी या ओळीतल्या उत्कट याचा अर्थ अट्टाहास असा लावते..पुढच्या पीढीवर आपण आपले विचार मते लादू नयेत..आपले वय झालेआहे हेओळखून ,सर्वच बाबतीतली ऊत्कटता व्यक्त न करता संयम बाळगणे हेच
योग्य!!

तसा दिवस समंजस, ओठ मिटून घट्ट
जुनी स्वप्ने उबवीत रात्र जागत नाही।।

नवीन पीढीबरोबर जुळवून घेण्यासाठी,थांबा आणि बघा हीच भूमिका योग्य..नको लुडबुड नको सल्ले…आणि जुनं उगाळत बसून स्वत:चं स्वास्थ्य न बिघडवणं हेच चांगलं…,

नवी फुले पाने ,रोज नवे गाणे,
सुगंध नी सूर काही मागत नाही

दिसतंय् नव्या पीढीचं तांत्रीक आयुष्य..सतत नवे बदल,
नवी टेक्नाॉलाॅजी..पण त्यातले हरवलेले सूर आणि सुगंध
स्वीकारणे हेच ठीक.वयोपरत्वे ही स्वीकृती पत्करली
तर सर्वांचेच आयुष्य सुखद होउ शकेल हाच संदेश यात शांताबाई देत आहेत…

मोहरलेली मने गगनगामी झुले
शिशीराशी नाते वसंत सांगत नाही.

या ओळींमधे थोडा खेद आहे.काहीशी नकारात्मकता आहे.सळसळतं नवं रक्त ,आणि उंच भरार्‍या…अनेक ध्येयंअनेक स्वप्नं यामागे धावत असताना नकळत मागच्या पीढीचा हात सुटला आहे
शिशीर म्हणजे पानगळ..वृद्धत्व.
वसंत म्हणजे पालवी,नवे धुमारे ..तारुण्य..
पण वसंत शिशीराशी नाते सांगत नाही…
वृद्धांविषयीचा ममताभाव ओसरलाय्.आई वडीलांना
त्यांच्या आयुष्यात स्थान नाही…

एकांताची वेल बहरुन येते जरी
ऋतुचे पण नव्या आता स्वागत नाही..

उरलं आहे ते ते एकाकीपण…आठवणींच्या फुलांनी ते बहरतं…पण आता पुन्हा यौवनात होणे नाही…आता फक्त पैलतीर….!!

वृद्धत्वात स्वत:ला समजवणारी,स्वीकृत,काहीशी उदास
अलीप्त अशी ही शांताबाईंची अप्रतीम काव्यरचना…
उत्कट तरीही संयमी ,समंजस…

सौ.राधिका भांडारकर

पुणे

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =