You are currently viewing शिरोडा-वेळागर येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर सापडला 

शिरोडा-वेळागर येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर सापडला 

वेंगुर्ले

शिरोडा वेळागर येथील समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या राजस्थान मधील युवक दीनदयाळ सत्यनारायण राव (20) याचा मृतदेह तो बुडालेल्या 200 मीटरच्या परिसरात आज तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी 5:45 च्या सुमारास आढळून आला. सदरचा मृतदेह लाईफ गार्ड संजय नार्वेकर व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि मच्छीमार अजू अमरे यांनी शिरोडा पोलिसांना खबर देत ते हजर होताच समुद्रातून किनाऱ्यावर आणला. शिरोडा वेळागर येथील समुद्रात दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास राजस्थान (जिल्हा-सिकर, तालुका श्रीमाधोपूर- सिकाना) येथील लादी, फरशी, प्लंबिंगचे काम करणारा कामगार दीनदयाळ सत्यनारायण राव (20) हा आंघोळ करून पर्यटनाचा आनंद लुटत असताना पाण्यात पडून बेपत्ता झाला. तब्बल दोन दिवस होऊनही तो सापडलेला नव्हता.

वेंगुर्ले पोलिसांनी सदर युवक शोधण्यासाठी शिरोडा-वेळागर येथील राज स्पोर्टच्या सहकार्याने वापरण्यात येणाऱ्या जलक्रीडा नौकेचा वापर करुन स्वतः जातीनिशी पोलीसांनी स्थानिक मच्छिमार, बेपत्ता युवकाचे नातेवाईक सोबत घेऊन समुद्रात शोध मोहीम राबविली. हि शोध मोहिम वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली या शोध मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दळवी, पोलीस नाईक योगेश राऊळ, काॅस्टेबल सुरज रेडकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. आज तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारपर्यंत शोध मोहीम राबवली. मात्र तरी तो सापडून आलेला नव्हता. मात्र सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास तो बुडालेल्या परिसरात 200 मीटरच्या भागात समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळला. याबाबतची माहिती लाईफ गार्ड संजय नार्वेकर व ग्रामपंचायत सदस्य अजू अमरे यांनी शिरोडा पोलीसांना दिली. त्यानुसार तात्काळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दळवी, योगेश राऊळ घटनास्थळी दाखल झाले. व सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर आणण्याच्या केलेल्या सूचनेनुसार लाईफ गार्ड संजय नार्वेकर स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व मच्छीमार अजू अमरे यांनी मृतदेह किनारी आणला.

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 17 =