You are currently viewing रंग राखाडी

रंग राखाडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*रंग राखाडी*

भस्म विलेपित भोळा सांब
पार्वती भाळली त्यावर
महायोगी समाधिस्थ
देवाधिदेव शिवशंकर!!

फिनिक्स सारखी घ्यावी
राखेतून झेप नव्याने
स्वप्नपूर्ती करावयास
मिळवावे सामर्थ्य निकराने!!

राखेखाली असते धग
घालावी हळू फुंकर
चेतवावा अंतर्मनातील
सुविचारांचा जागर!!

राखाडी रंग संयमाचा
आहे प्रतिक विरक्तीचं
त्याग समर्पण निर्मोह
पावित्र्य असतं भस्माचं!!

राखेतही असते तेवत
स्वाभिमानाची ठिणगी
उठ सखे अस्तित्वाची
ज्योत उजळ जागोजागी !!
🌹🌹☘️🌻☘️🌹🌹

अरूणा दुद्दलवार…दिग्रस यवतमाळ👍🙏🌹✒️

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − thirteen =