You are currently viewing काय करू नये

काय करू नये

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*काय करू नये*
*काव्यप्रकार—फटका*
*वृत्त—हरिभगिनी(८+८+८+६ मात्रा)*

काय बरोबर काय चूक ते मनाप्रमाणे ठरू नये
उठल्यासुटल्या न्यायनिवाडा अशाप्रकारे करू नये

हे फालतू नि ते टाकाऊ परंपरांना म्हणू नये
शास्त्रार्थाच्या मुळास जावे वरवर चर्चा करू नये

विज्ञानाची कास धरावी अज्ञानाला भुलू नये
सज्ञानाला सूज्ञ समजणे गल्लत कधि ही करू नये

आधुनीकता नावाखाली सनातनाला हिणवु नये
आदर्शाचा विचार व्हावा संस्कृतीस त्या विसरु नये

लिंगभेद ते भान असावे कमी कुणाला लेखु नये
कुरघोडी अन वादावादी चिखलफेकही करू नये

जातिभेद वा प्रांतभेद वा भाषाभेदा मानु नये
एकत्वाने पुढे सरावे मागे कुणाहि ओढु नये

श्रद्धेचा उपमर्द कराया ईश्वरनिंदा करू नये
उपदेशास्तव हेमंताच्या राग मनी तो धरू नये

—हेमंत कुलकर्णी
मुलुंड, मुंबई

 

प्रतिक्रिया व्यक्त करा