You are currently viewing स्वप्न

स्वप्न

स्वप्न

पाहिलं होतं एक स्वप्न…
तुझ्याच,
फक्त तुझ्याच मनी बसण्याचं,
तुझ्याच हृदयी शिरण्याचं.

पाहिलं होतं एक स्वप्न…
तुझ्याच,
फक्त तुझ्याच नयनी दिसण्याचं,
तुझ्याच माथी सजण्याचं.

पाहिलं होतं एक स्वप्न…
तुझ्याच,
फक्त तुझ्याच गाली खुलण्याचं,
तुझ्याच ओठी फुलण्याचं.

पाहिलं होतं एक स्वप्न…
तुझ्याच,
फक्त तुझ्याच संगे जगायचं,
तुझ्याच संगे मरायचं…

पाहिलं होतं एक स्वप्न….!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − one =