*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मोक्षानंद*
~~~~~~~
अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या सरबत्तीत
खरे तर आपण रोजच जगत असतो
प्रश्न म्हणजे भौतिकतेतलं गूढ असतं
त्याचा शोध सांत्वनी भावस्पर्श असतो
आजकाल भावप्रीतीचे सारे मृगजळी
नेत्री केवळ सुखाचा भ्रमभास असतो
सत्य सुखदा केवळ जन्माचे जन्मदाते
स्वर्गसुखाचा तोच अपूर्व दृष्टांत असतो
कृतज्ञतेने त्यांच्याच चरणी लीन व्हावे
तोच कृपावंती कृपाळू मोक्षानंद असतो
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*वि.ग. सातपुते*
