*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.सरिता परसोडकर लिखित अप्रतिम गीतरचना*
*युगलगीत*
तो …स्मरतो अजून मला सखे तो माड
त्याच्या मी उभा अल्याड तू उभी पल्याड
ती… ठाऊक आहे मला चांगला तो माड
तुझ्या माझ्या प्रीतीचा तोच आहे द्वाड.
तो…. सागर किनारी चालत होतो घेऊनी हाती हात
कळून आले तेव्हा साजणी झाली होती रात
प्रीतीची ती साक्ष देण्या होते एकच झाड
तुझ्या माझ्या प्रीतीचा तोच एक द्वाड.।
ती.. व्दाड नको म्हणू त्याला दिली त्यानेच साथ
कवटाळता त्याला तू घेतला हाती माझा हात
तेव्हापासून लगेच साजना पाहु लागले स्वप्न गोड
तो ..स्मरतो अजून मला सखे तो माड
त्याच्या मी उभा अल्याड तू उभी पल्याड..
तो आणि ती मिळून..
बघ स्वप्न पाहिले राणी आपण किती ते गोड
हसरे घरात येणार तिसरे त्याच्याशी नाते जोड
स्मरू सारखा आता पुन्हाः पुन्हाः तो माड
त्याच्या मी उभा अल्याड तू उभी पल्याड..
सौ सरिता परसोडकर✍🏻
पुसद
