You are currently viewing फोंडाघाटच्या श्रेया पावसकरची पुण्यात क्रिकेटमध्ये चमक

फोंडाघाटच्या श्रेया पावसकरची पुण्यात क्रिकेटमध्ये चमक

फोंडाघाटच्या श्रेया पावसकरची पुण्यात क्रिकेटमध्ये चमक

मेडिकल शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही ठसा; कॉलेज टीमला मिळवून दिला करंडक

फोंडाघाट :

फोंडाघाट येथील कु. श्रेया संतोष पावसकर हिने पुण्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत फोंडाघाटच्या नावाला मानाचा तुरा खोवला आहे. मेडिकलसारख्या कठीण शिक्षणासोबतच तिने क्रीडाक्षेत्रातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

श्रेया हिने आपल्या क्रिकेट संघासह कॉलेज स्पर्धेत दमदार खेळ करत करंडकावर नाव कोरले. तिच्या या यशामुळे फोंडाघाट परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी श्रेया तसेच तिच्या पालकांचे अभिनंदन केले. लवकरच तिचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या महिला क्रिकेटमध्ये महाराष्ट्रातील मुली मोठ्या प्रमाणात चमकत असून श्रेयानेही आपल्या गुणवत्तेच्या जोरावर फोंडाघाटचे नाव उज्वल केले आहे. तिचे वडील संतोष पावसकर हे व्यापारी असून मुलीला दिलेले प्रोत्साहन निश्चितच भूषणावह असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा