You are currently viewing शिरवल गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी – पालकमंत्री नितेश राणे

शिरवल गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी – पालकमंत्री नितेश राणे

शिरवल गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी – पालकमंत्री नितेश राणे

हिंदु धर्माची विचारधारा प्रत्येकाच्या मनामनात रुजविण्याचे काम ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज करीत आहेत

कणकवली

शिरवल गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिरवलवासीयांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत.त्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी या भागाचा लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून माझी आहे.त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरेविकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिरवल येथे श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर येथे दिली.

कणकवली तालुक्यातील शिरवल येथील श्री.विठ्ठल – रखुमाई मंदिर येथे आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरीनाम सप्ताह कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी भेट दिली.यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचा शिरवल विठ्ठल रखुमाई मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वारकरी सांप्रदायिक मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.श्री.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ह.भ.प.काशीनाथ महाराज फोकमारे, सुनील कुडतरकर, अनंत गोळवणकर, भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पंढरी शिरवलकर, महेश शिरवलकर,सुचित गुरव, सुर्यकांत सावंत,बबन गुरव, भिकाजी सावंत, राजेंद्र चव्हाण, दिनेश घाडीगांवकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की,शिरवल गाव म्हटलं तर, सन्माननीय राणेसाहेंबाना मानणार हे गाव आहे. वर्षानुवर्षे खासदार नारायण राणे यांच्या विचारांवर चालणारे या गावातील लोक आहेत.

ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज हे शिरवल ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने गेली १० वर्षे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन करीत आहेत.हिंदु धर्माची विचारधारा प्रत्येकाच्या मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाच्या वतीने ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज करीत आहे.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचनातून वैचारिक आणि धार्मिक प्रबोधन होत असुन जनमानसात सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे.
या उत्सवाच्या निमित्ताने संत मेळा साकारल्याचे दिसत आहे .असे पालकमंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा