You are currently viewing दीपक केसरकरना समर्थन नाही

दीपक केसरकरना समर्थन नाही

वेंगुर्ला शिवसेनेचा निर्णय

वेंगुर्ले

आमदार दिपक केसरकर जरी शिंदे गटात सामील झाले असले तरी वेंगुर्ले तालुक्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहतील, अशी भूमिका वेंगुर्ला तालुका शिवसेना बैठकीत घेण्यात आली.
यावेळी पदाधिकार्‍यांच्या वतीने शिवसेनेच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या बैठकीला कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना यशवंत परब म्हणाले की, २० जूनला महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेपासून शिवसेनेला हेलावणारी घटना समोर आली.एकनाथ शिंदे व अन्य आमदारांचा गट गुजरातमध्ये गेल्याची बातमी झळकली.बहुसंख्य आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याची बातमी प्रसारमाध्यमांवर येत असताना या मतदारसंघाचे आमदार असलेले दिपक केसरकर हेही त्या गटात सामील झाल्याची बातमी आज गुरुवारी सोशल माध्यमांवर येत आहे.परंतु कोणी – कुठेही गेले तरी वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहणार,असा एकमुखी निर्णय झाला आहे. यावेळी पदाधिकारी यांच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या.यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, सचिन देसाई,उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,युवासेना चे पंकज शिरसाट,दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत,संदिप केळजी,दयानंद खर्डे,संजय गावडे, आनंद दाभोलकर, शैलेश परुळेकर,अण्णा वराडकर,गजानन गोलतकर,वेदांग पेडणेकर, सुयोग चेंदवणकर,राणे,कौशल मुळीक,बटा आदींसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =