You are currently viewing सायकल बँक शुभारंभ ११ जुलै रोजी

सायकल बँक शुभारंभ ११ जुलै रोजी

मा. खा. सुरेश प्रभु शेर्पा-पंतप्रधान,भारत सरकार यांचा वाढदिवसा निमित्त जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व गोवा विमानतळ प्राधिकरण यांचा संयुक्त विद्यमाने मानव साधन विकास संस्था संचालित परिवर्तन केद्र संकल्पनेतर्गत मालवण तालुका सायकल बँकचे उद्घाटन ११ जुलै २०२१ रोजी सकाळी ११.००वा कन्याशाळा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.
सायकल बँक अंतर्गत अ. शि. दे. टोपिवाला हायस्कुल, कृ. शि. देसाई शिक्षण मंडळ, डॉ.श्रीधर शांताराम कुडाळकर हायस्कुल. या हायस्कुल मधिल प्रत्येकी दहा विद्याथिना मोफत सायकल देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला मा. डॉ. सुभाष दिघे. मा. राजन वराडकर उपनगराध्यक्ष, मा. श्रीपाद पंतवालावलकर, मा.दिगंबर सामंत. मा. भालचंद्र राऊत. मा.संतोष गावडे अध्यक्ष पञकार संघ, मा.गणेश कुशे यांचा प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 4 =