You are currently viewing लंडनची राणी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

लंडनची राणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*लंडनची राणी*

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८सप्टेंबर २०२२ रोजी स्काॅटलँड येथील बालमोरल प्रसादात निधन झाले ही बातमी ऐकताच मन नक्कीच हळहळले.
मला तर ती नेहमीच कथेतल्या राणी सारखीच भासायची. हसरी, प्रसन्न मुद्रा! निळे डोळे, गौरवर्ण. डोक्यावरच्या निरनिराळ्या रंगांच्या हॅट्स. गळ्यातल्या हिर्‍या मोत्यांच्या माळा! हातातले मोजे आणि हात हलवत जनसमुदायात फिरणारी ती सुरेख मूर्ती!

ती ब्रिटीश साम्राज्ञी अनंतात विलीन झाली.

७० वर्षे तिने ब्रिटनचे राणी पद भूषवले. काही राष्ट्रकुल देश, आणि स्वायत्त्त ब्रिटिश वसाहतीचे राष्ट्रप्रमुख पद सांभाळले. बहुतांना राणी एलिझाबेथ यांच्याशिवाय राज सिंहासनावर इतर कोणी व्यक्ती माहित नाही.

एलिझाबेथ अलेक्झांडर मेरी विंडसर यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी लंडनमध्ये झाला. पंचम जॉर्ज यांचे द्वितीय पुत्र अल्बर्ट आणि एलिझाबेथ यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. मार्गारेट रोझ ही त्यांची धाकटी बहीण. दोघींचे शिक्षण लंडनमध्ये घरातच झाले. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण होते.

घोडे आणि कुत्रे यांच्या विषयी त्यांना अपार आकर्षण आणि प्रेम. ग्रामीण भागातच आयुष्य व्यतीत करावे आणि घोडे कुत्रे यांच्या सहवासात रमावे एवढीच त्यांची जीवनाविषयीची अपेक्षा होती. मात्र काही नाट्यमय घटना घडल्या आणि त्या राजसिंहासनावर आरुढ झाल्या.

पंचम जॉर्जेचे जेष्ठ पुत्र डेव्हिड (जॉर्ज आठवे) यांनी राज्यत्याग केला. राजा हा इंग्लंडच्या चर्चचा प्रमुख असतो. डेविड ने एका घटस्फोटीताशी केलेले लग्न त्या काळाच्या संकेतांना धरून नसल्यामुळे डेव्हीडने राजत्याग केला व त्यांचे कनिष्ठ बंधू अल्बर्ट हे राजे झाले. जॉर्ज सहावे या नावाने ते ब्रिटनचे राजे झाले. त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठ कन्या एलिझाबेथ या थेट वारस म्हणून ब्रिटनच्या राणीपदावर विराजमान झाल्या. त्यावेळी त्यांचे वय अवघे २६ वर्षाचे होते.

दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. १९४७साली त्यांचा विवाह फिलिप यांच्याशी झाला आणि त्यांच्या समवेत आफ्रिका दौऱ्यावर असताना, तरुणपणीच युद्ध जर्जर देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. मात्र त्यावेळी अत्यंत समरसून त्यांनी राजेशाहीचा (कॉन्स्टिट्यूशनल मोनार्ची) अभ्यास केला.

एकीकडे लोकशाही आणि दुसरीकडे राजेशाही परंपरा हा विरोधाभास ब्रिटनमध्ये शतकानुशतके होता. नव्या पिढीकडून या विसंगती विषयी आवाज उठवायला सुरुवातही झाली होती. आलिशान प्रसादात राहणाऱ्या राजघराण्याला सर्वसामान्य जनतेच्या समस्या काय समजणार? कोट्यावधी पौंड यांच्यावर कशासाठी खर्च करायचे? असे विरोधी वातावरण ब्रिटनमध्ये तयार होऊ लागले होते. स्कॉटलंड, वेल्स, आयर्लंड या ब्रिटनच्या काही भागांमध्ये स्वातंत्र्याचे अंगार पेटत होते. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे काम राणी एलिझाबेथ यांनी प्रामाणिकपणे चालू ठेवले.

राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी त्या तज्ञांशी सतत संपर्क ठेवत. पार्लमेंट आणि राजघराणे यांच्यातील सीमारेषा त्यांनी कधीही ओलांडली नाही. त्यांच्या कौटुंबिक, वैयक्तिक आयुष्यातले संघर्ष, दुःखद प्रसंग यांचे कधीही प्रदर्शन त्यांनी केले नाही. जनतेच्या त्या राणी होत्या. त्यांच्याप्रती स्थितप्रज्ञता, तटस्थपणा, संवेदनशीलता, स्थैर्य आणि जबाबदारी त्यांनी काटेकोरपणे पाळली. जनतेच्या मातृत्वाची भूमिका त्यांनी सत्तर वर्षे बजावली.

१५ ब्रिटिश पंतप्रधान त्यांनी पाहिले. १४ अमेरिकी अध्यक्ष त्यांच्या आयुष्यात त्यांना पाहायला मिळाले. २० ऑलिंपिक्स त्यांनी पाहिले.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तीनवेळा भारतास भेट दिली.
महात्मा गांधीजींनी त्यांना एक रुमाल भेट म्हणून दिला होता. तो त्यांनी आदरपूर्वक सांभाळला.

एक प्रदीर्घ काळ त्यांनी भोगला. अनुभवला. आणि या दीर्घतेतही प्रेम आणि आपुलकी सातत्याने जपली. आणि म्हणूनच ९६व्या वर्षी, ७० वर्षे राणीपद निभावून अंतिम श्वास घेणाऱ्या या व्यक्तीविषयी आज सर्वत्र दुःख आणि हळहळ व्यक्त होत आहे.

लंडन ब्रिज फॉलींग…!!
गुड बाय टू क्वीन एलिझाबेथ…
राणी तुला अखेरचा दंडवत..!!

राधिका भांडारकर
अटलांटा यु एस आय

 

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − five =