You are currently viewing आठवणीतील दिवाळी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

आठवणीतील दिवाळी

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*आठवणीतील दिवाळी…*

दिवाळी म्हटल्यावर मी अगदी लहान झाले हो, तब्बल साठ
वर्षे मागे गेले मी ! मी कापडणासारख्या खेड्यात होते.
जेंव्हा पासून आठवते ते असे..
खोड्यापाड्यातून त्या काळी मी पाहिले ते असे, संध्याकाळी
गाड्या भरभरून येणारा शेतातला माल. त्या काळी निसर्ग इतका बिथरला नव्हता.पिके बऱ्यापैकी येत असत. संध्याकाळी कपाशीची भोत भरून घरी यायची. सालदार
टोपले भरभरून कोपऱ्यात कपाशी भरत व त्या उंच उंच
जाणाऱ्या ढिगाऱ्यावर आम्ही पोरे चढून तिला खुंदत नाचत
असू.वेचणी होई पर्यंत दररोज हा कार्यक्रम चालत असे .
त्याचा ढिग अगदी छतापर्यंत जात असे.मग भाव वाढेल याची
वाट पहात महिनोन महिने कपाशी घरात असे व योग्य भाव
मिळाला की व्यापारी दारात येऊन किंवा बैलगाड्या भरून
कपाशी धुळ्याच्या मार्केटयार्डला जात असे.म्हणजे ऐन दिवाळीत गावात घरोघर कामांची अशी टिप्परघाई असे.
तिथे कुणाला फराळ बनवायला सवड होती?

काही घरातून भुईमुगाच्या शेंगांची उपटण्याची , त्या साठी
मजुर लावायचे, शेंगांची झाडे मुळासकट उपटून गोळाकरून
खळ्यात आणायची किंवा शेतातच शेंगा ठोकून (तोडून)
भोत भरून माल घरी आणायचा व मग अंगणात झोरे अंथरून
त्या वाळवायच्या. अशी कामांची गर्दी असल्यावर व थकून
भागून घरी आल्यावर चटणी मिरची खाऊन मंडळी ढाराढूर
व्हायची! हे मी अशा साठी सांगितले की खेड्यात असे चोचले
करायला बिलकूल वेळ नसे. व पैसा ही नसे. व असला तरी
जपून खर्चायची प्रवृत्ती असे.संध्याकाळी घरोघर बैल गाई
बकऱ्या मेंढऱ्या कोंबड्या घरी येण्याची गडबड असे. गाई गुरं
खुंट्याला बांधायची, बकऱ्या ओट्यावर बांधायच्या, कोंबड्या
टोपली खाली झाकायच्या व वरून काहीतरी वजन ठेवायचे ,
त्यांना पळून जाता येऊ नये व त्या संकटात सापडू नये म्हणून!
अशी व्यवस्था लावण्यात मंडळी गुंग असत.

हे सगळे आटोपले की मग एक दोन पणत्या दारासमोर
ठेवायच्या! हो जास्त तेल जाळायला का पगार होत होते
तिथे? मुळीच नाही. सारा कारभार काटकसरीचाच!आणि
फटाके? ते तर मुळीच वाजत नसत? असे पैसे जाळायला
हातात भरपूर पैसे हवे ना? इथे तर रात्रं दिवस राबून हाती
काही लागेल का याची मुळीच शाश्वती नसे?

दिवाळी अगदी तोंडावर आल्यावर मात्र घराघरातून एक दोनच
पदार्थ बनत असत ते ही माफकच! मुले किराणा दुकानातून
एखाद दुसरी टिकल्यांची डबी आणून ती ही पुरवून पुरवून
दिवसभर पिटिक पिटिक करत फोडत असत व तेवढ्यावर
खुष असत.दिवाळीच्या दिवशी भल्या पहाटे न्हावी(बलुतेदार)
घराघरातून अंघोळी साठी व दाढी करवून घेण्यासाठी मोठ
मोठ्याने हाकारे घालत असे. उठा हो दादा, दाढी करी ल्या हो!
पानी ठेवा ताई, अन्नानी आंघोय करता बरं .. असा तो खूप
घरी फिरत असे. कारण बलुतेदार म्हणून त्याचे ते काम असे.
मग आंघोळ करून मंडळी देवदर्शन करून येत आपापल्या कामाला लागत असत. तिथे सुट्टीबिट्टी हा प्रकारच नव्हता.
असे राबले तरच वर्षभर खायला मिळत असे.मजुरांना तर
रोज कामावर जावेच लागायचे!

मंडळी, ह्या शहरी दिवाळीची व खेड्यांचा काही संबंध नव्हता.
खेड्याचे अर्थकारणच वेगळे होते.तिथे ना खर्चाला वाव होता
ना सवड होती.माझे वडील पुढारलेले व धुळे जिल्ह्यातील
नामांकित स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे आमच्या घरी वातावरण थोडे वेगळे होते.वडिल हौसी होते.ते फटाके
आणायचे, घुळ्याहून येतांना. मला व भावाला बंदूक आणायचे.
मग आम्ही मजेत फटाके फोडायला लागलो की अख्खी गल्ली
गोळा होत असे.मग मुलांची ही ऽऽऽऽ गर्दी होत असे अंगणात!
अप्पा आम्हाला जवळ बसून लवंगीच्या माळा सोडवून फटाके
मोकळे करून देत असत. व ओट्यावर बसून लक्ष ठेवत असत.

माझा मोठा भाऊ तेव्हा (५७/५८ ची गोष्ट आहे) पुण्याला व बहिण धुळ्याला शिकत होते. मी सगळ्यात लहान, घरात.
त्या वर्षी भावाने माझ्यासाठी दप्तर पाटी व एक फुटपट्टी
आणल्याचे चांगले स्मरणात आहे . तो बाहेर शिकत असल्या
मुळे मी त्याला खूप घाबरत असे. (नंतर तो मला घाबरत असे
मी मोठी झाल्यावर )ते दप्तर मी मोठ्या टेचात मिरवत असे.
हो, बाकी कुणाकडेच नव्हते ना तसे? म्हणून .तर मंडळी ही
दिवाळी कशी ही असो ती मनात रूतून बसली आहे. फुलझाडीच्या तारा हॅंण्डल सारख्या वाकवून जोतऱ्याच्या कडेला त्यावर लाकडी छोटी फळी ठेवून ते तारेचे हॅंन्डल फिरवून आम्ही दिवसभर गाडी चालवत असू. किती छान
होते ना ते दिवस! पैसा नव्हता तरी कसले सोयरसुतक
नव्हते! खूष होतो, दिवस दिवस खेळत होतो, आनंदात होतो!
हे सारे मनाच्या कुपीत बंद होते ते आज तुमच्या समोर उलगडले. छान वाटते आहे तुमच्याशी बोलतांना.

आता तर खेडीच नको तितकी बदलली आहेत. पुर्वीचे काही
राहिले नाही, लोक ही नाही नि संस्कृती ही नाही.सारी वाताहत
झाली, लोक ही बदलले आहेत. ना प्रेम आहे ना आपुलकी.
जिकडे तिकडे स्वार्थाचा बाजार आहे नुसता! चालायचेच!

“ कालाय तस्मै नम:”

धन्यवाद ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २६ / १० /२०२२
वेळ : रात्री ३/४०

 

Advt

*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃‍♀️🏃‍♂️

*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*

_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_

*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*

*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*

*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*

*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*

*_👩🏻‍🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*

*_👨🏻‍🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*

*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*

*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*

_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_

*📲9763824245 /9420196031*

*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + four =