You are currently viewing श्रावण झुला स्नेहाचा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

श्रावण झुला स्नेहाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या…सह्याद्री वाहिनी, आकाशवाणी वर कार्यक्रम सादर केलेल्या, विविध क्लब सदस्या लेखिका कवयित्री प्राचा.सीमा शास्त्री मोडक लिखीत अप्रतिम कथा*

*श्रावण झुला स्नेहाचा*

रमा अजूनही वडिलांच्या  दुःखातून सावरली नव्हती.  बाबांना जाऊन दोनच महिने झाले होते. दादा आणि वहिनी आता आपल्याशी कसे वागतील, आई ला त्रास देतील का? आपलं माहेर संपेल का? या साऱ्या गोष्टींचं दुःख होतं तिला.आई रमाला लग्न झाल्यावर हेच सांगायची, “बघ बरं रमा,आमच्या नंतर तुला माहेर राहणारच नाही”.  त्यामुळे आईच्या सुरात रमाही सूर मिळवायची. रमाची आई, कविता ताई रमाला नेहमीच वैदेही आणि राम बद्दल उलट-सुलट सांगायच्या. खरंतर ते दोघेही खूप चांगले होते. पण स्पष्टवक्ते होते. “रमा अगं किती रडशील? तुला त्रास होईल”. योगेश रमाला समजावत होता. “बाबांचं खूप वाईट झालं खरं. निदान तुझे वर्षभराचे सण तरी पाहायला हवे होते. त्यांना खूप कौतुक होतं तुझं”.
” हो रे आता आई आहे, पण श्रावणात मंगळागौर नागपंचमी हे सण बाबांना खूप थाटात साजरे करायचे होते”.” रमा बाबा नाहीत म्हणून काय झालं? तुझे दादा वहिनी आहेत ना ते करतील. ते खूप चांगले आहेत”. रमाला मात्र योगेशचं बोलणं पटलं नाही कारण आईने सांगितलेले शब्द तिच्या कानात घुमत होते. रमाची मंगळागौर दोन महिन्यांनी श्रावणात करायची होती. रक्षाबंधन सोमवारी म्हणून तोच मंगळावर ठरवला म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार असं रमाला राहणे सोयीचे होईल.
कविताताई मंगळागौरीच्या मुलींना बोलावणं करायला गेल्या आणि समोरच्या उभ्या असलेल्या गाडीला जाऊन धडकल्र्या. त्यांच्या पायाला, हाताला बरंच लागलं होतं. रस्त्यावरच्या लोकांनी त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. नशिबानं वाचलेल्या मोबाईल मधून रमाला फोन केला. रमाच्या मैत्रिणीचा पत्ता घेऊन तिलाच मंगळागौरीचं आमंत्रण द्यायला त्या निघाल्या होत्या.  पण, नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं.
रमाने रामदादाला फोन करून कळवलं.राम आणि वैदेही पंधराव्या मिनिटाला हॉस्पिटलमध्ये होते.  आईला लागलेले पाहून रमा रडायलाच लागली. योगेश आणि वैदेहीने तिला सावरलं. पायात राॅड टाकून ऑपरेशन झालं. हाताला प्लास्टर केलं. कविताताईंना  पंधरा दिवसांनी घरी आणलं. आता मंगळागौर, नागपंचमी होणार नाही हे त्यांनी मनाशी ठरवून टाकलं. “योगेश बघ आता तर साधी घरातही होणार नाही माझी मंगळागौर.आई अंथरुणावर आहे. राम दादा आणि वहिनी त्यांच्या कामात”. रमा म्हणाली.  योगेशने मात्र तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला याबद्दल शंकाच होती  त्याला. तिकडे वैदेहीने कविताताईंसाठी दोन महिन्याची रजा घेतली. रमाला पहिलाच महिना असल्याने डॉक्टरांनी तिला  विश्रांती घ्यायला सांगितली होती.  वैदेही  मनापासून सेवा करत होती आणि हो रामही आईला वेळेवर औषध इंजेक्शन देत होता.  या सेवेबरोबरच रमाच्या मंगळागौरीची तयारीही वैदेही करत होती. सासूबाई आणि रमा यांना मात्र याबद्दल सुतराम कल्पना नव्हती. श्रावण महिना सुरु झाला. पहिला मंगळवार गेला. रमा हिरमुसली. ठरलेला दुसरा मंगळवार आता रद्द झाला होता. आईजवळ तसे तिने बोलूनही दाखवले. कविताताई मात्र आता वैदेही आणि राम विरुद्ध काहीच बोलल्या नाही. कारण त्यांच्या मनातील सर्व गैरसमज दूर होत होते. त्यांना समजत होतं की ते दोघेही खूप चांगले आहेत.पण दादा वहिनीला आपलं प्रेम नाही ह्याच गैरसमजुतीत रमा होती. कविताताई आता बऱ्या होत होत्या. स्वतःची रोजची कामे करण्याचा प्रयत्न करत होत्या. मनातून राम आणि वैदहीचे कौतुक करत होत्या. त्या दोघांबद्दल केलेल्या गैरसमजा बद्दल स्वतःला दोष देत होत्या.      शनिवारी सकाळीच राम आणि  वैदेही रमाला घ्यायला गेले.”रमा अगं तुला न्यायला आलोय आम्ही. माझीही  रजा संपेल आता, तर चल तू ही चार दिवस”, वैदेही म्हणाली.
“पण मी योगेशला, आईंना विचारलं नाही”. “अगं रमा  एवढी दादा आणि वहिनी आलेत कौतुकाने तर जा”. रमाच्या सासुबाई म्हणाल्या.   रमाला पाहून कविताताई आनंदी झाल्या. रमाला भेटावसं वाटतंय असं आदल्याच दिवशी बोलल्या होत्या त्या.
दुसऱ्या दिवशी सकाळीच रमाच्या सासरचे आले.  रमाला आश्चर्यच वाटलं. खोलीत वहिनीला सांगायला जाणार तोच वैदेही आलीच.तिनं रमाला हॉल मध्ये नेलं तो हाॅल पाहून रमला खूप रडूच आले.”आई माझ्या चोर चोळीची तयारी वहिनीनं खूप सुंदर केली.वहिनी थँक्यू”. अतिशय सुंदरपणे चोळीचा कार्यक्रम झाला.सासरचे मुक्कामालाच होते हे पाहून रमाला थोडं आश्चर्यच वाटलं. पण ती बोलली नाही.
नागपंचमीला सोमवारी सकाळीच रमाने झाडाच्या फांदीला टांगलेला  फुलापानांनी सजवलेला झोका पाहिला. रमाला बाबांची आठवण आली. अगदी असाच झोका सजवणार होते ते.” दादा  तूच केलंस ना हे. अरे किती करताय तुम्ही. मला बाबांची उणिव भासलीच नाही”. तो दिवस सुद्धा रमाच्या आठवणीत राहिल असा होता.तरीही  रात्री झोपतांना तिच्या मनात विचार आलाच की आई बरी असती तर मंगळागौर झाली असती.
मंगळवारी रमा  उठली ती आवाजानेच. वैदेहीने तिला तयार व्हायला सांगितले. सगळे गाडीत बसून हाॅलवर गेले.’ मंगळागौर साजरी होणार. ते ही ह्या मोठ्या सजवलेला हॉल मध्ये’ हे ऐकून तर रमा थक्कच झाली. मंगळागौरीसाठी पाच सवाष्णी आल्या होत्या. वैदेहीने तिचे स्वतःचे दागिने रमासाठी आणले होते. गजरे, पूजेचे सामान सगळी तयारी तिने केलेली होती. हे सारे बघून रमा आणि कविता त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. “वैदेही, राम अरे काय बोलू मी? तुम्ही हे जे कौतुक करत आहात ना, तेवढं आम्हालाही नसतं जमलं. खरं सांगते माझी सेवा, रमाचे लाड हे सगळं पाहून मी तृप्त झाले.” कविताताई म्हणाल्या. “खरचं दादा, वहिनी मला तर वाटलं होतं की बाबा नंतर माझं माहेर संपलंच. पण आता वाटतंय मी पूर्ण चुकीची होते. माझं माहेर, माझी हक्काची माणसं आहेतच.” आई आणि रमाने राम, वैदेहीची सगळ्यांसमोर क्षमा मागितली. आणि पुन्हा कधी गैरसमज करणार नाही सांगितले. रमा आईला म्हणाली, “आई माझा गैरसमज दूर केला तो ह्या श्रावणाने. खरच श्रावण हा प्रेम, संस्कार, संस्कृती, रूढी, परंपरा सगळं घेऊन येतो. या श्रावणानेच माझ्या जीवनात आनंद, समाधान, मिळाले.” खरच प्रेम, आनंद, नात्यातील ओलावा टिकवून ठेवणारा हा श्रावण म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीयच!

सीमा उषा अरुण  शास्त्री
सौ सीमा श्रीराम शास्त्री मोडक
जयवंत चौक, मोडक गल्ली
नंदुरबार
9420762730

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =