You are currently viewing जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी स्वाती पाटील यांची निवड

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी स्वाती पाटील यांची निवड

बांदा

पंचायत समिती सावंतवाडी शिक्षण विभाग आयोजित 49 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य या स्पर्धा प्रकारात कास नं.1 शाळेच्या शिक्षिका सौ.स्वाती पाटील यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या साहित्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे 12ते 13 सप्टेंबर या कालावधीत संपन्न झालेल्या या विज्ञान प्रदर्शनात स्वाती पाटील यांनी ज्ञानरचनावादी शिक्षण या विषयावर आधारित साहित्याची मांडणी केली होती. त्यांना मुख्याध्यापक स्वाती नाईक सहकारी शिक्षक महेश पालव ,प्रकाश गावडे , उज्ज्वला धुरी यांचे मार्गदर्शन मिळाले.
स्वाती पाटील यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर ,केंद्र प्रमुख अनंत कदम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापू कासकर यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा