You are currently viewing वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याजवळ कुडाळ नगरपंचायतीचा अतिरिक्त कारभार..

वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याजवळ कुडाळ नगरपंचायतीचा अतिरिक्त कारभार..

 

वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याजवळ कुडाळ नगरपंचायतीचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.प्रशासकीय कारणास्तव कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांची बदली झाल्यानंतर कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे कोणाकडे दिली जातील याबाबत चर्चा होती. याच दरम्यान वैभववाडीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याजवळ कुडाळ नगरपंचायतीचे रिक्त असलेले मुख्याधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी सुरज कांबळे कुडाळमध्ये कधी हजर होणार आणि कुडाळमध्ये किती दिवस वैभववाडीमध्ये किती दिवस असणार याबाबत लवकरच त्यांनी कार्यभार स्वीकारल्यावर समजणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा