You are currently viewing पणजी येथे डाक अदालत

पणजी येथे डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी 

पोस्टमास्तर जनरल,गोवा क्षेत्र पणजी 403001 व्दारा दिनांक 30 मार्च 2021 रोजी 11.00 वाजता पोस्टमास्तर जनरल,गोवा क्षेत्र पणजी यांचे कार्यालयामध्ये डाक अदालत अयोजित केलेली आहे. पोस्टाच्या कार्यपध्दतीविषयी व कामकजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल.   टपाल,स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारत घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. संबधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार  के.बालाराजू सेक्रटरी, डाक अदालत आणि सहायक डाकनिदेशक, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र पणजी, 403001 यांचे नावे दोन प्रतिसह दिनांक 12 मार्च 2021 पर्यत पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतील जाणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − twelve =