You are currently viewing सिंधुदर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांची बॅ.नाथ पै कोवीड केअर सेंटरला भेट..

सिंधुदर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांची बॅ.नाथ पै कोवीड केअर सेंटरला भेट..

जागतिक परिचारिका दिनाच्या दिल्या शुभेच्छा..

कुडाळ :

बॅ.नाथ पै  शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित, बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालय व भौतिकोपचार महाविद्यालयाच्या वतीने 25 खाटांचे मोफत कोविड केअर सेंटर दिनांक 01 मे 2021 पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत 26 रुग्ण या कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत.

जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मान.श्री. राजेंद्र दाभाडे यांनी  या  कोवीड सेंटर ला भेट देऊन रुग्णांची, सेवेची पाहाणी केली.यावेळी त्यांच्या सोबत कुडाळ स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. शंकर कोरे उपस्थीत होते.

सद्य:स्थितीत महाराष्ट्रात,जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र शासन तत्परतेने आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करीत आहे. यातच बॅ.नाथ पै  शिक्षण संस्थेने सेवाभावी वृत्तीने नि:शुल्क कोवीड केअर सेंटर तयार करुन जी सामाजिक बांधीलकी जोपासली, या बद्दल संस्थेचे चेअरमन श्री.उमेश गाळवणकर यांचे व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. कोवीड सेटर मधील रुग्णांना औषधोपचाराबरोबरच भजन, नामस्मरण यासारख्या कार्याक्रमामुळे रुग्णांना मानसिक बळ तसेच त्यांच्यातील अनुकूल ऊर्जा वाढवीण्यासाठी  पुरविल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आज जागतिक परीचारिका दिन म्हणजेच आधुनिक नर्सिंग चळवळीचे जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस. हा दिवस संपूर्ण जगामध्ये परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बॅ.नाथ पै कोविड केअर सेंटर मधील कर्मचाऱ्यांना श्री. राजेंद्र  दाभाडे यांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. आणि त्या देत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =